एक्स्प्लोर
'बेबी'च्या आधीची कथा, प्रिक्वेल 'नाम शबाना'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : सिनेमाचं कथानक पुढे घेऊन जाणारे सिक्वेल बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. मात्र हॉलिवूडमध्ये दिसणाऱ्या प्रिक्वेलचं प्रस्थ आता हिंदी चित्रपटात आलं आहे. दिग्दर्शक नीरज पांडे 'बेबी' चित्रपटाचा प्रिक्वेल 'नाम शबाना' घेऊन येत आहे. 'नाम शबाना' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
'बेबी' चित्रपटात पडद्यावर घडलेल्या कथानकाच्या आधीची कथा प्रिक्वेलच्या माध्यमातून उलगडणार आहे. 2015 साली नीरज पांडे दिग्दर्शित 'बेबी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा प्रिक्वेल 'नाम शबाना' 31 मार्चला रिलीज होत आहे.
बेबी चित्रपटात गुप्तचर संघटनेत काम करणारी शबाना अर्थात तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अॅक्शन दृश्यांनी तापसीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सामान्य शबानाचा रॉ एजंट म्हणून 'बेबी मिशन'मध्ये सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास 'नाम शबाना' चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
नीरज पांडे यांचे 'अ वेनस्डे', 'बेबी', 'स्पेशल 26', 'एम एस धोनी' यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. उत्कंठावर्धक चित्रपट देणाऱ्या नीरज पांडेंच्या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement