Nako Rusu Ga Maze Aai : 'नको रुसू ग माझे आई' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; प्रवीण कुवरने केल शब्दबद्ध
Nako Rusu Ga Maze Aai : 'नको रुसू ग माझे आई' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Nako Rusu Ga Maze Aai : एकविरा आईच्या भक्तांसाठी 'नको रुसू ग माझे आई' (Nako Rusu Ga Maze Aai) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. नुकतंच या गाण्याचा लॉंचिंग सोहळा पार पडला. प्रथमेश कदम आणि अंकिता राऊत हे कलाकार या गाण्यात झळकले आहेत. कोळीबांधवांच्या दिलावर राज्य करणारी त्यांची एकविरा आई कायमच तिच्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
कार्ल्याच्या डोंगरावर बसलेल्या या एकविरा आईच्या चैत्र महिन्यातील यात्रेला जाता न आल्याने आई तू रागवू नकोस, कायम आम्हा भक्तांवर कृपा ठेव असे सांगणाऱ्या कोळी जोडप्याची आर्त हाक 'नको रुसू ग माझे आई' या गाण्यातून प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार आहे.
या गाण्याचं संगीत सुप्रसिद्ध गायक, संगीतकार प्रवीण कुवर यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तसेच त्यांनीच या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे बोल परशुराम बगडे लिखित असून या गाण्याला स्वरबद्ध करण्याची बाजू गायक प्रवीण कुवर जी आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी सांभाळली. तर या गाण्याचे दिगदर्शन मोहन शिखरे यांनी केले आहे. 'नको रुसू ग माझे आई' हे गाणं 'कार्टूनली स्टुडिओ' प्रस्तुत असून या गाण्याची निर्मिती निर्माती संजीवनी आवेश सोनावणे आणि निर्माते आवेश दत्ता सोनावणे यांनी केली आहे. या गाण्याला ठेका धरायला लावण्यास नृत्यदिग्दर्शक जितेश कदम यांनी साथ दिली.
गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला 'नको रुसू ग माझे आई' या गाण्यातील कलाकार प्रथमेश कदम आणि अंकिता राऊत आणि संगीतकार प्रवीण कुवर, गायिका सोनाली सोनावणे तसेच सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाक्ती, अभिनेता नीक शिंदे आणि विजय सोनावणे हेदेखील उपस्थित होते.
'नको रुसू ग माझे आई' हे गाणं प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करण्यास आलं असून एकविरा आईचे दर्शनही या गाण्यातून घडते आहे. विशेषतः एकविरा आईच्या भक्तांना या गाण्याचा आस्वाद घेणे रंजक ठरणार यात शंकाच नाही. तर अंकिता आणि प्रथमेशची फ्रेश जोडी या गाण्यातून प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडते आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या