एक्स्प्लोर

The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, "बनावट कथा केवळ..."

Sabarmati Report : द साबरमती रिपोर्ट चित्रपटावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून ती सध्या व्हायरल होत आहे.

The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय याला प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळत आहे. आता या चित्रपटावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. द साबरमती रिपोर्ट चित्रपटावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून ती सध्या व्हायरल होत आहे.

'द साबरमती रिपोर्ट' वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

गोधरा-कांडवर आधारित द साबरमती रिपोर्ट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांचे कौतुक केल आहे. त्यांनी म्हटलंय, निर्मात्यांनी या चित्रपटाद्वारे 'बनावट कथा' दूर करण्यात मदत केली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मात्यांचं कौतुक केलं आहे आणि त्यांनी सत्य समोर आणण्याचं काम केल्य़ाचं सांगितलं आहे.

'साबरमती रिपोर्ट'चं पंतप्रधानांकडून कौतुक

आलोक भट्ट यांनी 'X' वर शेअर केलेले ट्वीट रिपोस्ट करून पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आलोक भट्ट यांनी त्यांच्या पोस्टमध्ये 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचं कौतुक केलं. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी लिहिले, "एकदम बरोबर".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स मिडिया अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिलंय की, "छान सांगितलं आहे. हे सत्य बाहेर येत आहे, हे चांगलेच आहे, आणि तेही एका प्रकारे सर्वसामान्यांना दिसेल. बनावट कथा केवळ मर्यादित कालावधीसाठी टिकू शकते. अखेरीस, तथ्य नेहमी बाहेर येईल!"

'द साबरमती रिपोर्ट'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

धीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सी याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींचं ट्वीट

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pushpa 2 Trailer : पुष्पा नाम नहीं ब्रँड हैं... फ्लावर नही वाईल्ड फायर... पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर आऊट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Dhome On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!
कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!
Cockroach Janata Party Follow By Bollywood Celebrity: कॉकरोच जनता पार्टीची सेलिब्रिटींनाही भूरळ; फॉलोअर्सच्या यादीत बड्या नट-नट्यांची नावं, कोण-कोण करतंय फॉलो?
कॉकरोच जनता पार्टीची सेलिब्रिटींनाही भूरळ; फॉलोअर्सच्या यादीत बड्या नट-नट्यांची नावं, कोण-कोण करतंय फॉलो?
Dhurandhar Movie Threat National Security: 'धुरंधर'मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका? उच्च न्यायालयाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश; लष्करातल्या जवानाची याचिका
'धुरंधर'मुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका? उच्च न्यायालयाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश; लष्करातल्या जवानाची याचिका
Amaal Malik On Industry Dark Side: वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'
वडील-चुलत्यांचं मोठं नाव, तरीही स्टारकीडला इंडस्ट्रीत मिळेना काम; खळबळजनक दावा करत म्हणाला, 'बॉलिवूडवाल्यांनी 60 फिल्म्समधून बाहेर काढलं...'

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Embed widget