The Kerala Story: लिपस्टिक अंडर माय बुरखा ते उडता पंजाब; 'द केरळ स्टोरी' आधी 'हे' चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटाच्या आधी देखील काही चित्रपट कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकले होते. जाणून घेऊयात त्या चित्रपटांबद्दल...
The Kerala Story: गेल्या काही दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची चर्चा होत आहे.या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येतं की, या चित्रपटाची कथा ही अशा मुलींवर आधारित आहे ज्या कॉलेजमध्ये शिकत असतात. त्या मुलींचे धर्मांतर केले जाते.केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून मुस्लिम बनवण्यात येते. हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक जण या चित्रपटाला विरोध करत आहेत. 'द केरळ स्टोरी' च्या आधी देखील काही चित्रपट कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकले होते. जाणून घेऊयात त्या चित्रपटांबद्दल...
पठाण
'बेशरम रंग' या गाण्यामुळे पठाण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 'बेशरम रंग' गाण्यामधील दीपिका पदुकोणची भगव्या रंगाची बिकीनी चर्चेचा विषय ठरली होती. अनेक लोकांनी पठाण या चित्रपटाचा विरोध केला होता.
'द काश्मीर फाइल्स'
'द काश्मीर फाइल्स'चं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून या चित्रपटाची कथा देखील त्यांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडावर आधारित आहे. हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
'पद्मावत'
'पद्मावत' या चित्रपटात दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 'पद्मावत' चित्रपटाचा राजस्थानच्या करणी सेनेसह काही संघटनांनी विरोध केला होता . या चित्रपटातील काही सिन्समुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
'उडता पंजाब'
ड्रग्जच्या मुद्द्यावर आधारित असलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाला देखील अनेकांनी विरोध केला. या चित्रपटामुळे पंजाबची प्रतिमा खराब होऊ शकते, असे सांगत अनेकांनी या चित्रपटाचा विरोध केला.
'लिपस्टिक अंडर माय बुरखा'
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा चित्रपट कथानकामुळे आणि चित्रपटतील काही दृष्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अलंकृता श्रीवास्तव या 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. या चित्रपटाला अनेकांनी विरोध केला होता कारण या चित्रपटात अनेक सेक्शुअल अॅक्ट सीन्स आहेत. यासोबतच शिवीगाळही चित्रपटात मोठ्या प्रमाणात होती. नंतर या चित्रपटाला ए सर्टिफिकेट देण्यात आलं.
'आश्रम'
प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा अनेकांनी विरोध केला. रिपोर्टनुसार, संतप्त लोकांनी भोपाळमधील 'आश्रम'च्या सेटची तोडफोड केली होती आणि प्रकाश झा यांच्यावर शाईही फेकण्यात आली.
'पीके', केदारनाथ हे चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.