The Kerala Story: द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत देवोलीनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, 'माझा नवरा मुस्लिम आहे आणि...'
एका नेटकऱ्यानं द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटला अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. आता या चित्रपटाच्या कथानकावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. एका नेटकऱ्यानं द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटला अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
नेटकऱ्याचं ट्वीट
एका नेटकऱ्यानं 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'माझ्या सहकाऱ्याची मैत्रीण निधी हिचे आंतरधर्मीय व्यक्तीसोबत संबंध होते. तिने तिच्या प्रियकराला द केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यास सांगितला. त्याने चित्रपट पाहण्यास केवळ नकारच दिला नाही तर तिचा छळ केला आणि तिच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा आरोप केला. ती घाबरली आणि तिने तिच्या बॉयफ्रेंडला विचारले की तो इतका रुड का आहे? मुस्लिम व्यक्तीला डेटिंग करत असताना मी इस्लामोफोबिक कशी असू शकते? असा प्रश्न देखील तिनं बॉयफ्रेंडला विचारला. तिच्या बॉयफ्रेंडने उत्तर दिले की जर ती इस्लामोफोबिक नसेल तर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा आणि त्याच्याशी लग्न करावे. तिने होकार दिला. पण तरीही तिला चित्रपट बघायचा होता. त्यामुळे ती माझ्या मित्रासोबत चित्रपट पाहायला गेली. चित्रपटानंतर लगेचच तिने तिला बॉयफ्रेंडला कॉल केला आणि ब्रेकअप केले. द केरळ स्टोरी चित्रपटाचा समाजावर हा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना या चित्रपटावर काही लोक बंदी घालत आहेत. सगळे जागे होत आहेत.'
देवोलीनाचा रिप्लाय
देवोलीनानं या नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'असे नेहमीच होऊ शकत नाही. माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले. हा चित्रपट त्यांच्या धर्माविरुद्ध आहे, असे त्याला वाटले नाही. मला असे वाटते की, प्रत्येक भारतीय असे असावे.' या ट्वीटमध्ये देवोलीनानं द केरळ स्टोरी हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
Its not always like that. My husband is a muslim & came with me to watch the movie & he appreciated it. He neither took it as an offence nor he felt it was against his religion. And i feel thats how every indian should be like. #TheKeralaStory https://t.co/Qr0NSd87X1
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 13, 2023
देवोलीनानं काही दिवसांपूर्वी जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. अनेकांनी देवोलीनाला ट्रोल देखील केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या: