Prakash Raj: 'द कश्मीर फाइल्स'नं दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावल्यानंतर प्रकाश राज यांचे ट्वीट; म्हणाले...
'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Awards 2023) मिळाल्यानंतर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prakash Raj: काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश राज यांचे ट्वीट
प्रकाश राज यांनी एका आर्टिकलचा स्क्रिनशर्ट शेअर केला आहे. या स्क्रिनशर्टला शेअर करुन कॅप्शनमध्ये त्यांनी दोन हॅशटॅग्सचा वापर केला. प्रोपोगंडा फाइल्स आणि जस्ट आस्ककिंग हे दोन हॅशटॅग्स प्रकाश राज यांच्या या ट्वीटमध्ये दिसत आहेत. प्रकाश राज यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
'द कश्मीर फाइल्स'वर केली टीका
एका कार्यक्रमात प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली होती. ते म्हणाले होते, 'द कश्मीर फाइल्स' हा एक नॉनसेन्स चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली, हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्याच्यावर थुंकतात. ते अजूनही निर्लज्ज आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतःहून विचारतायत, ‘मला ऑस्कर का मिळत नाही?’"
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे, "दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स'नं सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. हा पुरस्कार काश्मिरी पंडित आणि आम्हाला आशीर्वाद दिलेल्या तुम्हा भारतीयांना समर्पित करतो".
ANNOUNCEMENT:#TheKashmirFiles wins the ‘Best Film’ award at #DadaSahebPhalkeAwards2023.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 21, 2023
“This award is dedicated to all the victims of terrorism and to all the people of India for your blessings.” pic.twitter.com/MdwikOiL44
'द कश्मीर फाइल्स' 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता विवेक अग्निहोत्रींचा 'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'द वॅक्सीन वॉर' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.'
महत्वाच्या इतर बातम्या :