बच्चन कुटुंबियांकडे अवतरली कोटीभर रुपयांची कार
बच्चन कुटुंबियांचं गाड्यांवरचं प्रेम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशातच सध्या त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये एक नवी कार दाखल झाली आहे.
मुंबई : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचं गाड्यांचं प्रेम सर्वश्रुत आहेच. अत्यंत विचार करून अमिताभ, अभिषेक गाडी घेत असतात. काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबियांनी मर्सिडिज बेंझचं नवं मॉडेल बुक केल्याची चर्चा सुरु झाली होती. तीच मर्सिडीज आता बच्चन कुटुंबियांकडे अवतरली आहे. गाडीची किंमत ऐकाल तर थक्क व्हाल.
मर्सिडीज बेंझ जीएलएक्स 2020 बनावटीची ही गाडी हचबॅक सेक्शनमध्ये येते. बच्चन यांनी घेतलेल्या गाडीचा रंग डार्क सिल्व्हर असा आहे. ही गाडी 6 सिलिंडर्सची असून पेट्रोल इंजिन 3.0 त्यात आहे. विशेष बाब अशी की, या गाडीत हायब्रिड टेक्नोलॉजीचा वापरण्यात आला आहे. ती 48 व्होल्टची आहे. अभिषेक बच्चनच्या पसंतीने ही गाडी ठरवण्यात आली. या गाडीची बाजारातली किंमत 99 लाख रुपये आहे. आणि ही एक्स शोरूम आहे. म्हणजे या गाडीची किंमत साधारण सव्वा कोटी रुपयापर्यंत जाते. या गाडीची सीसी पॉवर तीन हजार आहे.
अभिषेक, अमिताभ, ऐश्वर्या आणि आराध्या या सगळ्यांनाच कोरोना झाल्यामुळे ही संपूर्ण फॅमिली रुग्णालयात दाखल झाली होती. कोरोनामुळे चित्रिकरणं बंद असल्यामुळे सर्व मंडळी घरीच होती. आता अमिताभ यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या सीझनचं चित्रिकरण सुरु केलं. तर अभिषेक बच्चनचा 'बिग बुल' नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या काळात एक गाडी घेण्यावरून कुटुंबियांत बरीच चर्चा झाली. अनेक उंची ब्रॅंड तपासले गेले. अखेर भारतात नव्यानेच दाखल झालेल्या या गाडीला पसंत केलं गेलं. ही गाडी आज बच्चन यांच्या घरी अवतरली.
महत्त्वाच्या बातम्या :