Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) अनेक दिवसांनी मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) ही जोडी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. स्वप्निलचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर स्वप्निलला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. मराठीतला चॉकलेट बॉय अशी स्वप्निल जोशीची इमेज आहे.
View this post on Instagram
स्वप्निलने एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो आता छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत देखील दिसतो. वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केलं आहे. पण आता 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15 Final : गेहराईयां चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिकाची बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री
Allu Arjun : अल्लू अर्जुन 16 दिवसांनी दुबईहून घरी परतला, लेकीने केले हटके स्वागत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha