एक्स्प्लोर
ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
![ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट Thane Court Issued Non Bailable Arrest Warrant Against Mamta Kulkarni And Vicky Goswami ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/28104355/Mamta_Kulkarni.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी याच्याविरोधात ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे.
एफिड्रिन जप्त केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायाधीश एच एम पटवर्धन यांनी सोमवारी दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
हे दोघेही अजून भारताबाहेर आहे. दोघांच्या अटकेसाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
ठाणे पोलिसांनी मागील वर्षी सोलापूरमध्ये एव्हॉन लाईफसायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा टाकला होता. यामध्ये दोन हजार कोटी रुपये किंमतीचं सुमारे 18.5 टन एफेड्रिन जप्त करण्यात आलं होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, एफिड्रिन एव्हॉन लाईफसायन्स ऑरगॅनिक कंपनीतून केनियात विकी गोस्वामी चालवत असलेल्या ड्रग रॅकेटकडे पाठवला जाणार होता.
पोलिसांनी या प्रकरणात 10 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या
सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड
एफिड्रिन ड्रग प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्याचं नाव
ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)