Thalapathy vijay: थलापती विजयच्या आगामी चित्रपटाचं नाव माहितीये? संजय दत्तही असणार... पाहा प्रोमो
थलापती विजयच्या (Thalapathy vijay) आगामी चित्रपटाचे नाव तात्पुरते 'थलापथी 67' (Thalapathy 67) असे ठेवण्यात आले होते. आता या चित्रपटाचं टायटल जाहीर करण्यात आलं आहे.
Thalapathy vijay: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy vijay) बहुचर्चित आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते टायटल 'थलापथी 67' (Thalapathy 67) असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल 'लिओ' (Leo) आहे असे जाहीर केले आहे.
मेकर्सने नेहमीच चित्रपटाशी संबंधित अपडेट्स प्रेक्षकांना दिले आहेत. दरम्यान, या सिनेमाच्या टायटलबद्दल दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे टायटल 'लिओ' आहे अशी घोषणा केली आहे. अशातच, निर्मात्यांनी सिनेमाचा एक जबरदस्त टायटल प्रोमो जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये उत्तम बीजीएमसह (BGM) थलापती विजयच्या काही सिन्सची झलक पाहायला मिळेल. हा प्रोमो पाहून असे म्हणता येईल की 'लिओ'हा चित्रपट निश्चितपणे 7 स्क्रीन स्टुडिओचा आणखी एक मास्टर पीस असल्याची हमी देतो.
— Vijay (@actorvijay) February 3, 2023
थलापती विजय (Thalapathy vijay), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि त्रिशा कृष्णन अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'लिओ'हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची दर्शकांची उत्सुकता वाढत आहे. 7 स्क्रीन स्टुडिओच्या 'लिओ' या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली असून, याचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापती विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.
'लिओ' या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी संजय दत्तने चांगलंच मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी संजयने 10 कोटी मानधन घेतलं आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी विजय हा बीस्ट या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. बीस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. बीस्ट चित्रपटात सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हा चित्रपट 13 एप्रिल रोजी रिलीज झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :