Thalapathy Vijay : थलापती विजयच्या अडचणीत वाढ; 'Leo'च्या रिलीजवर बंदी; नेमकं प्रकरण काय?
Leo Release Stalled : हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित 'लियो' सिनेमाच्या रिलीजला 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
Thalapathy Vijay Leo Release Stalled : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) सध्या 'लियो' (Leo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'लियो' या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित 'लियो' सिनेमाच्या रिलीजला 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
'लियो'च्या रिलीजला 20 ऑक्टोबरपर्यंत बंदी
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हैदराबाद येथील एका न्यायालयाने 20 ऑक्टोपर्यंत थलापती विजयच्या बहुचर्चित 'लियो' सिनेमावर बंदी घातली आहे. सितारा एंटरटेनमेंटचे नागा वामनी यांनी 'लियो' या शीर्षकाचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला होता. या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणीही करण्यात आली होती.
विजय थलापतीचा 'लियो' हा सिनेमा सुपरहिट होणार आहे. अर्ली मॉर्निंग शोसाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. तामिळनाडू सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 'लियो'च्या रिलीजसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सिनेमाचा सकाळचा शो नसेल. सकाळी 9 वाजताचा पहिला शो असणार आहे.
View this post on Instagram
अॅक्शनचा तडका असलेला 'लियो'
'लियो' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात थलापती विजयसह तृषा कृष्णन, अर्जुन सरजा, गौतम मेनन, मैसस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. रत्ना कुमार आणि धीरज वैद्य यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे.
'लियो' हा सिनेमा भारतात 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. विजय स्टरर हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा असणार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे. रजनीकांतच्या जेलरला हा सिनेमा टक्कर देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'लियो'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
'लियो' हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. दुसरीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'लियो' या सिनेमाने भारतात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'पठाण' (Pathaan) या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 32 कोटी आणि 'जवान' (Jawan) या सिनेमाने 40 कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या