Thalapathy Vijay : थलापती विजयने मोडला शाहरुखचा रेकॉर्ड! 'Leo'ने परदेशात रचला विक्रम
Leo : थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Thalapathy Vijay Leo Movie : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये 'थलापती विजय'चा (Thalapathy Vijay) समावेश होतो. थलापतीच्या 'लियो' (Leo) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाने रिलीजआधीच नवा विक्रम रचला आहे. थलापती विजयने शाहरुखचा (Shah Rukh Khan) रेकॉर्ड मोडला आहे.
थलापती विजयचा 'लियो' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमाची जगभरात चांगलीच क्रेझ आहे. 'कैथी' आणि 'विक्रम' या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या लोकेश कनगराज यांनीच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. भारतापाठोपाठ परदेशातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली.
यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा ठरला 'लियो'
'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यूकेमध्ये या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग चांगलच होत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशीच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. त्यामुळे यूकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय सिनेमा 'लियो' ठरला आहे.
View this post on Instagram
थलापती विजयने मोडला शाहरुखचा रेकॉर्ड!
यूकेमध्ये आतापर्यंत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या सिनेमांनी सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन जमवलं आहे. शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं होतं. 'पठाण'ने रिलीजच्या दिवशी दिवशी 3 कोटी 22 लाख रुपयांची कमाई केली होती. तर 'लियो'ने पहिल्या दिवशी आतापर्यंत 3 कोटी 23 लाखांची कमाई केली आहे. यूएसएमध्ये लियो हा चित्रपट 2D ते XD ते IMAX आणि RPX पर्यंतच्या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
बॉक्स ऑफिस गाजवायला थलापती विजय सज्ज!
'लियो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करणार आहे. लियो या सिनेमात विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासह त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. 'लियो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या