Leo Advance Booking: थलापती विजयच्या ‘Leo’ नं अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली कोट्यवधींची कमाई! 'जवान' आणि 'पठाण' ला टाकणार मागे?
Leo Advance Booking: लियो चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात 'लियो' चित्रपटाच्या कमाईबाबत...
Leo Advance Booking: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा 'लियो' (Leo) हा चित्रपट 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 'लियो' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. लियो चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात 'लियो' चित्रपटाच्या कमाईबाबत...
'लियो' या विजयच्या चित्रपटाची आतापर्यंत 37346 तिकिटे विकली गेली आहेत. 'लियो'ने आतापर्यंत जवळपास 6.92 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे कलेक्शन चित्रपट रिलीज होण्याच्या सात दिवस आधीचे आहे. रिपोर्टनुसार, 'लियो' हा चित्रपट जवळपास 1000 स्क्रीन्सवर रिलीज होणार होता, पण आता हा चित्रपट 1338 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.
यूएसए मधील सर्वात मोठ्या मुव्ही सीरिजपैकी एक असलेल्या AMC ने देखील 'Leo' च्या अॅडव्हान्स बुकिंग सुरूवात केली. असे म्हटले जात आहे की, ' लियो' चित्रपटानं रिलीजपूर्वी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 1.2 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करेल. यूएसए आणि कॅनडामध्ये ' लियो' जवान या चित्रपटाला मागे टाकेल, असा अंदाज लावला जात आहे. जवान चित्रपटांनी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 5.22 कोटी रुपये कमावले होते आणि पठाणने 6.05 कोटी रुपये अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमवले होते. आता अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पठाण आणि जवान या चित्रपटांना लियो चित्रपट खरंच मागे टाकेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
यूएसएमध्ये लियो हा चित्रपट 2D ते XD ते IMAX आणि RPX पर्यंतच्या फॉरमॅटमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचे बहुतांश स्क्रिनिंग तामिळ आणि तेलुगूमध्ये केले जाणार आहे.
थलपथी विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त 'लियो' या चित्रपटात त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत. लोकेश कानगराज यांनी 'लियो' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लियो या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
लव्ह टुडे,पूवे उनाक्कागा , प्रियामुदन,थुल्लाधा मनामुम थुल्लुम, कधालुक्कू मरियाधाई ,थुप्पक्की,कठ्ठी या थलपथी विजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्याचा लियो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: