फिल्म प्रोड्युसर बीए राजू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; महेश बाबू, प्रभाससह अनेकांना शोक अनावर
बीए राजू यांनी प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआरसह अनेक सेलिब्रिटीजचे पीआरओ म्हणून काम पाहिले होते.
मुंबई : ज्येष्ठ फिल्म जर्नलिस्ट आणि तेलुगू सिनेमा निर्माते बीए राजू यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांचा मुलगा शिवकुमार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. बीए राजू यांना काही आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुगर लेवल ड्रॉप झाल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
बीए राजू तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक अविभाज्य भाग होते. ते लोकप्रिय तेलगू चित्रपट मासिक ‘सुपरहिट’ चे संस्थापक आणि संपादकही होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांसाठी पीआर म्हणून देखील काम केले. सुपरस्टार महेश बाबूचे पर्सनल पीआरओ देखील होते. त्यांनी अनेक आघाडीचे स्टार्स, प्रोडक्शन हाऊसेस आणि अभिनेत्रींसाठी पीआरओ म्हणून काम केले. बीए राजू यांनी प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआरसह अनेक सेलिब्रिटीजचे पीआरओ म्हणून काम पाहिले होते.
बीए राजू यांच्या निधनाबद्दल टॉलीवूड इंडस्ट्रीने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. टॉलीवूड अभिनेता महेश बाबू यांनी ट्वीट केले की, "बीए राजू यांच्या आकस्मिक निधनामुळे मला धक्का बसला आहे. मी त्यांना लहानपणापासूनच ओळखतो. आम्ही बर्याच वर्षांपासून एकत्र आहेत आणि मी त्यांच्यासोबत अगदी जवळून काम केले आहे.
Not able to process the sudden demise of BA Raju garu. I've known him since my childhood. We travelled together for many years and I worked with him very closely. pic.twitter.com/N6gbW8DPxv
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) May 21, 2021
ज्युनियर एनटीआरने लिहिले, "बीए राजू गारू यांच्या अचानक निधनाने मला धक्का बसला आहे. एक ज्येष्ठ चित्रपट पत्रकार आणि पीआरओ म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत खूप योगदान दिले आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील माझ्या सुरुवातीच्या दिवसांपासून मी त्यांना ओळखायचो. हे एक मोठं नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो हीच प्रार्थना.
The sudden demise of BA Raju Garu has left me in shock. As one of the most senior film journalists & PRO,he has contributed greatly to the Film Industry. I've known him since my earliest days in TFI. It is a huge loss.Praying for strength to his family. Rest in Peace Raju Garu 🙏🏻 pic.twitter.com/B5lytChlqW
— Jr NTR (@tarak9999) May 22, 2021