Telly Masala : मुलाखतीवरुन अभिनेत्री कियारा अडवाणी ट्रोल ते श्रद्धा कपूरची पुष्पा 2 मध्ये एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'क्राइम पेट्रोल'मध्ये पोलिसाची भूमिका अन् आता स्वत:चं केला गुन्हा, अपहरण प्रकरणात बेड्या; कोण आहे ही अभिनेत्री?
Entertainment News : टीव्ही मालिकेमध्ये पोलिसाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीनेच गुन्हा केल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शबरीनला मुलाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अभिनेत्री शबरीनला पालघरमधील तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शबरीन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'क्राइम पेट्रोल' मध्ये झळकली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
कियारा अडवाणीला माहीत नाहीत दक्षिण भारतातील राज्यांची नावं, शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर त त प प, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kiara Adwani Viral Interview Ram Charan & Rana Daggubati : अभिनेत्री कियारा अडवाणीचा मोठा चाहतावर्ग आहे. कियाराने बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच कियारा अडवाणी साऊथ सुपरस्टार राम चरण आणि राणा दग्गुबत्ती यांच्या 'नंबर 1 यारी' शोमध्ये झळकली. या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी कियाराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देता न आल्याने ती ट्रोल होताना पाहायला मिळत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सीरम इंस्टिट्युटचे CEO अदर पुनावालांची बॉलिवूडमध्ये गुंतवणूक, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सचे 50 टक्के शेअर्स विकत घेणार
Serum Institute Stakes in Dharma Production : कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्युटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या कंपनीमध्ये हिस्सेदारी विकत घेणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाल 50 टक्के भागीदारी विकत घेणार आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000 कोटी रुपयांना होणार असल्याची माहिती आहे. वॅक्सिन मेकर सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला आता बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणार आहे. धर्मा प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे, त्यामुळे त्यात हिस्सेदारी घेत आता अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सोहेल खानसाठी ज्याच्यासोबत तोडलं नातं, त्याचं व्यक्तीला डेट करतेय Ex वाइफ सीमा सजदेह
Seema Sajdeh Dating Life : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्यासह त्याचं कुटुंब चर्चेत आलं आहे. सलमानचा भाऊ अभिनेता सोहेल खान याची एक्स-वाइफ सीमा सजदेह यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. सीमा सजदेहने पळून जाऊन सोहेल खानसोबत लग्न केलं होतं. 1998 मध्ये सोहेल आणि सीमा यांनी लग्न केलं, त्यानंतर 2022 मध्ये लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. या दोघांना दोन मुले आहेत. घटस्फोट झाल्यानंतर दोघेही स्वत:चं वैयक्तिक आयुष्य वेगळेपणाने जगत आहेत. अशात आता सीमा सजदेहच्या पर्सनल लाइफ चर्चेत आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
"मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय..."; गायिकेवरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध गायकानं ओलांडल्या मर्यादा, पतीकडेच मागितलेला 'तिचा' हात
Jagjit Singh And Chitra Singh Love Story: मैफिलींमधून थेट घराघरांत गझल पोहोचवणारे दिग्गज गझलकार जगजीत सिंह (Jagjit Singh) म्हणजे, गझलप्रेमींचं दैवत. जेवढे ते त्यांच्या गझल आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. तसेच, त्यांचं वैयक्तिक आयुष्याही तेवढंच चर्चेत होतं. पंजाबमधून एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जगजित सिंह यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या निर्णयांनी अनेक सामाजिक चौकटी मोडल्या. अनेक चालीरितींच्या विरोधात जाऊन ते आपलं आयुष्य जगले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी खूशखबर! पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जूनसोबत स्क्रीन शेअर करणार?
Shraddha Kapoor Entry in Pushpa 2 : स्त्री 2 चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या प्रसिद्धीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या चित्रपटाच्या यशामुळे तिला वेगळच स्टारडम मिळालं आहे. श्रद्धा कपूरचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात लाखो-कोट्यवधी चाहते आहेत. श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरची अल्लू अर्जून स्टारर पुष्पा 2 चित्रपटामध्ये एन्ट्री झाल्याची माहिती आहे. श्रद्धा कपूर अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती अल्लू अर्जूनसोबत डान्स करताना दिसू शकते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...