एक्स्प्लोर

Telly Masala : दबंग भाईजानची चाहत्यांना मनोरंजनाची ईदी ते 'श्रीरामा'साठी रणबीर रात्रंदिवस घाम गाळतोय; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Salman Khan : दबंग भाईजानची चाहत्यांना मनोरंजनाची ईदी; नव्या चित्रपटाची दणक्यात घोषणा

Salman Khan :  बॉलिवूडचा दबंग स्टार  सलमान खानचा (Salman Khan) यंदाच्या ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज झाला नाही. त्याने काही प्रमाणात नाराज असलेल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी भाईजानने ईदच्या दिवशी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खानचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'सिंकदर' (Sikandar) असे या चित्रपटाचे नाव आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ramayana :'श्रीरामा'साठी रणबीर रात्रंदिवस घाम गाळतोय; वर्कआऊट व्हिडिओ पाहताच लोक म्हणाले, आग लावणार!

Ranbir Kapoor Intense Workout For Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'रामायण' (Ramayana) हा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. रणबीर कपूरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूर खूप मेहनत घेत आहे. धनुर्विद्या प्रशिक्षकासोबतचा अभिनेत्याचा एक फोटो समोर आला होता. आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. रणबीरचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर रात्रंदिवस घाम गाळताना दिसून येत आहे. त्याचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून चाहते आग लावणार असं म्हणत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rajshri Deshpande : "फक्त BOLD SCENES' दाखवणं हा निव्वळ आळशीपणा"; राजश्री देशपांडे स्पष्टच म्हणाली

Rajshri Deshpande : राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सीरिजनंतर प्रेक्षकांचा अभिनेत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बददला. आता 'आरपार' या  युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजश्री देशपांडे म्हणाली,"फक्त बोल्ड सीन (Bold Scenes) दाखवणं हा आळशीपणा आहे. इंटिमेट सीन (Intimate Scene) टाकावेच लागतात, असं म्हणणारी लोक आळखी असतात". अभिनेत्रीच्या या वक्तव्याने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजश्री देशपांडेचे अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता अभिनेत्रीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Amruta Khanvilkar : तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे; अमृता खानविलकरने व्यक्त केला संताप

Amruta Khanvilkar :  चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी  सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियाचा वापर करतात. अभिनेते-अभिनेत्री हे आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. सण-उत्सव आणि काही कार्यक्रमातील फोटोही शेअर करतात. अनेकदा ट्रोलिंगलाही सेलेब्सना सामोरे जावे लागते. अनेक कलाकार फोटो, व्हिडीओवर येणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्षही करतात. मात्र, अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपला संताप व्यक्त केला आहे. एका  स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये? असा सवाल करत  तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे असे ट्रोलर्स, आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना सुनावले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

OTT Release This Week : ओटीटीवर 'या' आठवड्यात रिलीज होणार बिग बजेट चित्रपट; ईदला तुम्ही कोणती फिल्म पाहणार?

OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) प्रत्येक आठवड्यात विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यंदाच्या ईदला (Eid 2024) अजय देवगणचा (Ajay Devgn) 'मैदान' (Maidaan) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. तर दुसरीकडे थरार, नाट्य, विनोद अशा जॉनरचे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स (Netflix), झी 5 (Zee 5), प्राईम व्हिडीओ (Prime Video) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट रिलीज होणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget