Telly Masala : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत शालिनी शिर्केपाटीलची एन्ट्री ते आमिरच्या लेकीचं लग्न; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ira Khan Nupur Shikhare Wedding : लग्न घटिका समीप आली! आमिर खानची लेक आज अडकणार लग्नबंधनात; 900 पाहुणे, सेलिब्रिटी अन् बरचं काही
Ira Khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक इरा (Ira Khan) आज बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकणार आहे. 900 पाहुणे आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' धमाकेदार वळणावर! मालिकेत पुन्हा होणार शालिनी शिर्केपाटीलची एन्ट्री; दिसणार मॉडर्न अंदाजात
Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अशातच आता या मालिकेत धमाकेदार वळण आलं आहे. शालिनी शिर्केपाटीलची मालिकेत एन्ट्री होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sridevi Prasanna : 'श्रीदेवी प्रसन्न'चा टीझर आऊट! सई-सिद्धार्थच्या आगळ्या-वेगळ्या लव्हस्टोरीनं वाढवली उत्सुकता
Sridevi Prasanna Teaser Out : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी (Marathi Movies) 2024 हे वर्ष खूपच खास असणार आहे. या वर्षात रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलर, विनोदी, ऐतिहासिक असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा लक्षवेधी टीझर आऊट झाला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Salman Khan : 'टायगर'नंतर बब्बर शेरच्या भूमिकेत दिसणार सलमान खान; कबीर खानने दिली सिनेमाची ऑफर
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसाठी (Salman Khan) हे वर्ष खूपच खास आहे. त्याचा एक मोठा चाहतावर्ग असून त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता कबीर खानने (Kabir Khan) आगामी सिनेमासाठी सलमान खानला विचारणा केली आहे. भाईजानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Delivery Boy : एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय 'डिलिव्हरी बॉय'! प्रथमेश परब मुख्य भूमिकेत; पोस्टर आऊट
Delivery Boy Poster Out : एकीकडे बॉलिवूडपट धमाका करत असताना मराठी सिनेमेदेखील (Marathi Movies) बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर आऊट झालं आहे.