Salman Khan : 'टायगर'नंतर बब्बर शेरच्या भूमिकेत दिसणार सलमान खान; कबीर खानने दिली सिनेमाची ऑफर
Salman Khan Movie : कबीर खानने (Kabir Khan) आगामी सिनेमासाठी सलमान खानला विचारणा केली आहे. भाईजानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसाठी (Salman Khan) हे वर्ष खूपच खास आहे. त्याचा एक मोठा चाहतावर्ग असून त्याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता कबीर खानने (Kabir Khan) आगामी सिनेमासाठी सलमान खानला विचारणा केली आहे. भाईजानच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सलमान खानचे गेल्यावर्षी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आणि 'टायगर 3' (Tiger 3) असे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे कमी पडले. तरीही भाईजानसाठी 2024 हे वर्ष खास ठरणार आहे. सलमानला अनेक बिग बजेट सिनेमांसाठी विचारणा होत आहे. करण जोहरच्या (Karan Johar) 'द बुल' या सिनेमामुळे सध्या तो चर्चेत आहे. अशातच आता कबीर खान (Kabir Khan) यांच्या 'बब्बर शेर' या सिनेमासाठीदेखील भाईजानला विचारणा झाली आहे.
कबीर खान यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी 'बब्बर शेर' या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात बॉलिवूडचा सुपरस्टार मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत कबीर खान यांनी दिले होते. आता त्यांनी सलमानच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलं आहे. काही मंडळी सलमानऐवजी दुसऱ्या सुपरस्टारला घेण्याची मागणी करत आहेत. पण या सिनेमासाठी सलमान खानचं कबीर यांची पहिली पसंती आहे.
कबीर खान यांनी काही दिवसांपूर्वीच सलमानची भेट घेतली आहे. तसेच येत्या काही दिवसांत त्यांची अनेकदा भेट होणार असल्याचेही म्हटले जात आहे. 'बब्बर शेर' या सिनेमासाठी भाईजानदेखील उत्सुक आहे. 'बब्बर शेर' हा सलमान खान आणि कबीर खान यांचा चौथा सिनेमा आहे. कबीर खानने सलमानच्या 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' आणि 'ट्यूबलाईट' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सलमान आणि कबीर खान यांची अनेकदा भेट झाली आहे. सिनेमाच्या कथानकावरही त्यांनी चर्चा केली आहे. जानेवारी महिन्यात या सिनेमाची संहिता तयार होणार आहे. येत्या 45 दिवसांत या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर येणार आहे. नव्या वर्षात सलमानच्या चाहत्यांना खास भेट मिळणार आहे.
कबीर सलमानला म्हणाला 'टायगर'
सलमानच्या टायगर या फ्रेंचायझीमधले सर्व सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'टायगर 3' या सिनेमालाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सलमानला टायगर बनवण्यात कबीर खानचा मोठा वाटा आहे. टायगरनंतर बब्बर शेरच्या माध्यमातून सलमान रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
सलमानच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Salman Khan Upcoming Movies)
सलमान खानचा 'द बुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. विष्णुवर्धान या सिनेमाची निर्मिती करत आहे. फेब्रुवारी महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या