Telly Masala : अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी ते 'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ram Mandir Inauguration : अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित ते आलिया भट्ट; राम मंदिराच्या उद्घाटनाला अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी, बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला (Ram Lalla) अवघे काही तास शिल्लक आहेत. देशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tharala Tar Mag : सायली-अर्जुनची माथेरान सफर; 'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही लोकप्रिय मालिका आता रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या मालिकेचा विशेष भाग पार पडणार आहे. या विशेष भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Fighter Advance Booking : हृतिक रोशनच्या 'फायटर'ने रिलीजआधी केली छप्परफाड कमाई; जाणून घ्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल
Fighter Advance Booking : हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Urfi Javed: राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त उर्फी जावेदच्या घरी होम हवन; व्हिडीओ शेअर करुन म्हणाली, "अभिनंदन!"
Urfi Javed: अयोध्येत आज राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा मोठ्या उत्साहानं पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार झाला आहे. अशातच आता नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेदनं (Urfi Javed) देखील तिच्या घरात पूजा केली. नुकताच उर्फीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती होम हवन करताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ramayana : राम राज्य ते रामायण; रामायणावर आधारित चित्रपट आणि मालिका नक्की बघा
Ramayana: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आज राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यानिमित्त तुम्ही रामायणावर आधारित असणाऱ्या चित्रपट आणि मालिका घरबसल्या पाहू शकता. जाणून घेऊयात रामायणावर आधारित असणारे चित्रपट आणि मालिकांबद्दल...