एक्स्प्लोर

Telly Masala : मॉम टू बी दीपिकानं नाकारली मोठी ऑफर! धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली ते बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक ठरला; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : टीव्ही मालिका आणि सिनेविश्वात सध्या काय-काय घडामोडी घडत आहेत, हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणनं बाळासाठी नाकारली मोठी इंटरनॅशनल ऑफर; चिमुकल्याचं संगोपनासाठी स्वत: करणार, आया ठेवणार नाही

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत निवांत वेळ घालवत आहे. अशात प्रेग्नेंसीनंतर दीपिका मोठ्या पडद्यावर पुनरागमन केव्हा करणार, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. काही चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की, दीपिका इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रेग्नेंसीनंतर लगेचच पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. पण, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिकाने एक मोठी आंतरराष्ट्रीय ऑफर तर नाकारलीच पण आपल्या बाळाची काळजी ती स्वतःच घेण्याचं ठरवलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोठी बातमी : फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईच्या मायेचे छत्र हरपले

मुंबई : प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानवर (Farah Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फराह खानच्या आईचं निधन झालं आहे. फराह खानची आई मेनका इराणी यांचं वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेनका इराणी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. गेल्या काही काळापासून त्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kiran Mane Social Media Post On Dharmaveer 2 : ''धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना...'',अभिनेता किरण मानेंची 'धर्मवीर-2' वरून राजकीय फटकेबाजी

Kiran Mane Social Media Post On Dharmaveer 2 :  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत असलेला 'धर्मवीर' चित्रपट प्रचंड गाजला होता. आता, या चित्रपटाचा सिक्वेल 'धर्मवीर-2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'धर्मवीर-2' मध्ये आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेदेखील (Salman Khan) या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरून अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय फटकेबाजी केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Dharmaveer 2 Release Date : 'धर्मवीर-2' ची रिलीज डेट पुढे ढकलली, समोर आलं महत्त्वाचं कारण

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2'  चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 'धर्मवीर 2' चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याचं मोठं कारणही समोर आलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पहिला स्पर्धक ठरला? अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत केलं शिक्कामोर्तब

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच प्रसिद्ध शो बिग बॉसच्या नव्या सीझनला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना नवीन सीझनची उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्कंठा लागली आहे. बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांच्या नावावरून पडद्या उघडण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 100 दिवस चालणाऱ्या या शोकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Mr. Bean Actor Rowan Atkinson Viral Photo : 'मिस्टर बीन'ची प्रकृती गंभीर? अभिनेता रोवनच्या व्हायरल फोटो मागील सत्य काय?

Mr. Bean Actor Rowan Atkinson Viral Photo Fact Check : 'मिस्टर बीन' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रोवन ॲटकन्सन (Rowan Atkinson) यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मागील काही दिवसांत रोवन ॲटकन्सन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे रोवनच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. 'मिस्टर बीन' हा आजाराने अंथरुणाला खिळला असल्याचे या फोटोत दिसून आले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget