एक्स्प्लोर

Scam 2003 The Telgi Story: तेलगी घोटाळ्यावर आधारीत वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी; मुंबई सत्र न्यायालयात याचिका

'स्कॅम 2003: द तेगली स्टोरी' (Scam 2003 The Telgi Story) ही वेब सीरिज आता  रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

Scam 2003 The Telgi Story: 2003 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला ढवळून काढणा-या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर प्रदर्शित होणा-या वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी यांनी याचिका दाखल करत या वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली आहे. त्यामुळे 'स्कॅम 2003: द तेगली स्टोरी' (Scam 2003 The Telgi Story) ही वेब सीरिज आता  रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

कुटुंबियांची भूमिका काय? 
'स्कॅम 2003: द तेगली स्टोरी' या वेब सीरिज रिलीज होण्यापूर्वी तेलगी कुटुंबियांची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप करत तेलगी कुटुंबियांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात अॅपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सहव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह ओटीटी यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. आपले वकील माधव थोरात यांच्यामार्फत दाखल केलेल्या या दाव्यात सनानं आरोप केला आहे की, ही मालिका एका पुस्तकावर आधारित आहे ज्यात सत्य परिस्थिती लिहिलेली नाही. त्यामुळे ही वेब सीरिज कुटुंबाच्या वैयक्तिक आणि खासगी अधिकारांच उल्लंघन करतं आहे. 

सना यांनी आरोप केला आहे की, कादंबरीत तेलगी यांची व्यक्तिरेखा खोटी, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय आणि अत्यंत बदनामीकारक पद्धतीनं रंगवली आहे. यातनं संपूर्ण कुटुंबाची बदनामी होत असल्यानं त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारं नुकसान होणार आहे. याशिवाय वेब सीरिजमुळे कुटुंबातील अल्पवयीन मुलांचंही मोठ नुकसान होईल. सना यांच्यामते अब्दुल करीम तेलगींनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिर आणि मशिदी बांधण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. याशिवाय त्यांनी अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला आहे. 

काय आहे तेगली स्टँप पेपर घोटाळा? 

स्टॅम्प पेपर घोटाळ्यात झालेली 30 वर्षांची शिक्षा भोगत असताना कारागृहातच 56 वर्षीय अब्दुल करीम तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये बंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला. साल 1993 ते 2002 दरम्यान तेलगीनं नाशिकमधील सरकारी सुरक्षा मुद्रणालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट स्टॅम्प पेपर छापले. त्यासाठी सरकारी लिलावात मशिनरी खरेदी केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर तेलगीनं बँका, विमा कंपन्या आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म्स यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना सवलतीत हे बनावट स्टँप पेपर विकले होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगीला 22 नोव्हेंबर 2001 रोजी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. तेलगीच्या अटकेनंतर हजारो कोटी रुपयांचा हा स्टँप घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात तेलगीचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ सराकरी तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले घनिष्ठ संबंधही उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं नाव देखील तेलगीसोबत  जोडलं गेलं होतं. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 48 गुन्हे दाखल आहे. ज्यात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचाही समावेश होता. पोलीसांनी याप्रकरणी सुमारे 500 कोटींचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले होते. मात्र त्याआधी तेलगीनं शकडो कोटींच्या बनावट स्टँप पेपर बाजारात विकले होते. हा तपास पुढे सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 22 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Embed widget