Anek : आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' ची रिलीज डेट ढकलली पुढे, नवे पोस्टर शेअर करत दिली माहिती
Anek : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' सिनेमा आता 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Anek : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) आगामी 'अनेक' (Anek) सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आधी 13 मे 2022 रोजी रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मान खुरानाने नवे पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयुष्मान खुरानाने नवे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"देशाला एकत्र आणण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. जीतेगा कौन? हिंदुस्थान!". रणवीर सिंहचा 'जयेशभाई जोरदार' हा सिनेमादेखील 13 मे 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन सिनेमांची टक्कर होऊ नये यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
अनुभव सिन्हाने 'अनेक' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा आधी 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पण आता निर्मात्यांनी पुन्हा या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना जोशुआची भूमिका साकारत आहे. 'अनेक' सिनेमानंतर आयुष्मान अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या 'डॉक्टर जी' सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा 17 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Dhaakad Teaser : 'धाकड'चा टीझर प्रदर्शित, कंगना रनौत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
मार्व्हल स्टूडियोजचा Doctor Strange 2 'या' दिवशी होणार रिलीज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)