Tamanna Bhatia Vijay Varma : "माय हॅपी प्लेस"; तमन्ना भाटियाने दिली प्रेमाची कबुली
Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाने अखेर विजय वर्मा बरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.
Tamanna Bhatia Vijay Varma : 'बाहुबली' फेम तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि 'दहाड' अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) सध्या चर्चेत आहेत. तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अखेर आता तमन्नाने विजयबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.
तमन्ना आणि विजयच्या डेटिंगच्या चर्चांना कशी सुरुवात झाली?
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांना गोव्यातील एका पार्टीत स्पॉट करण्यात आले होते. या पार्टीतील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते. त्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. अनेकदा दोघे एकत्र दिसले असले तरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही भाष्य केलं नाही.
View this post on Instagram
तमन्नाने नुकत्याच एका मुलाखतीत रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,"मला नाही वाटत की तो तुमचा सहकलाकार आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होता. आजवर मी अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्या संबंधित व्यक्तीच्या प्रेमात पडता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जाता. ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे".
विजय वर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना तमन्ना म्हणाली,"माझं आणि विजयचं नातं खूप खास आहे. भारतात जोडीदारासाठी काही गोष्टी बदलाव्या लागतात. पण विजयने मला मी जशी आहे तसं स्वीकारलं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदाचं कारण झाला आहे".
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची पहिली भेट कुठे झाली?
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची पहिली भेट 'लस्ट स्टोरीज 2' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाला. हा दोघांचाही पहिला प्रोजेक्ट होता. अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर बाल्कि आणि सुजॉय घोष यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. लग्नासह त्यांच्या आगामी प्रोजेक्टचीदेखील चाहते प्रतीक्षा करत आहेत.
संंबंधित बातम्या