Tadap Teaser: सुनील शेट्टीच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; अहानच्या 'तडप' चा टीझर रिलीज
'तडप' या चित्रपटामध्ये तारा आणि अहानची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Ahan Shetty And Tara Sutaria Tadap Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) अनेक वर्ष त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) देखील अभिनय क्षेत्रात काम करत आहे. आता सुनिलचा मुलगा अहानने (Ahan Shetty) देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. अहानच्या 'तडप' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा टीझर प्रदर्शित करून चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट देखील घोषित केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज (27 ऑक्टोबर) प्रदर्शित होणार आहे.
Introducing our next #NGETalent #AhanShetty as Ishana! Witness his raging love in #SajidNadiadwala's #Tadap 🔥@TaraSutaria @milanluthria @rajatsaroraa @ipritamofficial @foxstarhindi @WardaNadiadwala #FoxStarStudios @TSeries pic.twitter.com/K8bjt1r2AB
— Nadiadwala Grandson (@NGEMovies) October 26, 2021
तडप चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षक उत्सुक झाले आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी तडपचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटामध्ये अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून असे लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक हे एका प्रेमकथेवर आधारित आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लूथरियाने केले आहेत.
तडप चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तारा सुतारियाने स्टूडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच मरजावां या चित्रपटामधून तारा प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता 'तडप' या आगामी चित्रपटामध्ये तारा आणि अहानची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Antim : The Final Truth सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, 26 नोव्हेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)