Swara Bhasker: स्वरानं 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'च्या अंतर्गत केलं लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईचे दागिने आणि साडी...'
स्वरानं (Swara Bhasker) नुकतेच फहादसोबतचे (Fahad Ahmad) काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
स्वराची पोस्ट
स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.' स्वराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Three cheers for the #SpecialMarriageAct (despite notice period etc.) At least it exists & gives love a chance… The right to love, the right to choose your life partner, the right to marry, the right to agency these should not be a privilege.@FahadZirarAhmad
— Swara Bhasker (@ReallySwara) February 17, 2023
✨✨✨♥️♥️♥️ pic.twitter.com/4wORvgSKDR
स्वरानं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, 'कुटुंब, मित्रांच्या प्रेमाने आणि त्यांच्या पाठिंब्यानं आनंद मिळाला. माझ्या आईची साडी आणि तिचे दागिने घातले. आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत नोंदणी केली. आता धुमधडाक्यात लग्न करण्याची तयारी करत आहोत.'
So blessed to be supported and cheered by the love of family and friends like family! Wore my mother’s sari & her jewellery.. made @FahadZirarAhmad wear colour :) and we registered under the #SpecialMarriageAct
— Swara Bhasker (@ReallySwara) February 17, 2023
Now to prep for shehnaii-wala shaadi ♥️✨@theUdayB pic.twitter.com/YwLS5ARbj4
काय आहे स्पेशल मॅरेज अॅक्ट?
स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 मध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्यास परवानगी दिली जाते. या कायद्यामध्ये ज्या जोडप्याला विवाह बंधनात अडकायचे आहे, त्याला रजिस्टर लग्न करण्याच्या आधी 30 दिवस आपली कादपत्रे आणि अर्ज द्यावा लगातो. अर्ज प्राप्त झाल्यावर जोडप्याला लग्न रजिस्टर करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जातो. 30 दिवसानंतर जोडप्याची परवानगी असेल तर ते लग्न रजिस्टर केले जाते.
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या:
Swara Bhasker: स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; फहाद अहमदसोबत बांधली लग्नगाठ