Swara Bhaskar: 'मॉम टू बी' स्वरा भास्करला पती फहाद अहमदनं दिलं खास सरप्राइज; अभिनेत्री बेबी शॉवर पार्टीचे फोटो शेअर करत म्हणाली...
Swara Bhaskar: फहादनं स्वरासाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते. या बेबी शॉवर पार्टीचे फोटो स्वरानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Swara Bhaskar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करच्या (Swara Bhasker) घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतेच फहादनं मॉम टू बी स्वराला एक खास सरप्राइज दिलं आहे. फहादनं स्वरासाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते. या बेबी शॉवर पार्टीचे फोटो स्वरानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बेबी शॉवर पार्टीच्या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद हे केक कट करताना दिसत आहेत. स्वरानं हे बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला सरप्राइज आवडते! गेल्या आठवड्यात, माझ्या सर्वात जुन्या मित्रांपैकी एक समर नारायण आणि लक्षिता यांनी आणि फहादने मला बेबी शॉवरच्या रूपात सर्वात गोड सरप्राईज दिले ज्याची त्यांनी मला कल्पना दिली नव्हती. खूप खूप धन्यवाद मित्रांनो! समर आणि लक्षिताने या गोड सरप्राइजबद्दल थँक्यु. हे होणारे बाळ खूप भाग्यवान आहे की, त्याला इतके प्रेमळ मासी आणि मामू तसेच नान आणि नानीज मिळाले आहेत.'
View this post on Instagram
स्वरानं शेअर केलेल्या बेबी शॉवर पार्टीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
स्वरा आणि फहाद यांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केले. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन स्वरा आणि फहाद यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली. स्वरा भास्करने ही गुडन्यूज दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
स्वराचे चित्रपट
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
स्वरा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवरील तिची मतं व्यक्त करत असते. स्वराच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेक वेळा नेटकरी तिला ट्रोल करतात.
महत्वाच्या इतर बातम्या:
स्वरा भास्करचं मॅटर्निटी फोटोशूट होतंय व्हायरल!