मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास कोण करणार हा सध्या राजकारणाचा मुद्दा बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती विरोध करत आहेत. अशातच सुशांतच्या कुटुंबियांकडून सतत हा दावा करण्यात येत आहे की, रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबियांपासून दूर केलं होतं. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर व्हॉट्सॅप चॅटचे काही स्क्रिनशॉर्ट शेअर केले होते. यामध्ये रियाने दावा केला होता की, सुशांतचे त्याच्या बहिणीसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते.
रिया चक्रवर्तीने स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आणखी काही मेसेजचे स्क्रिनशॉर्ट समोर आले आहेत. ज्यामध्ये सुशांतचे वडील आणि रिया यांच्यात झालेल्या संवादाचे मेसेज समोर आले आहेत. यामध्ये सुशांतचे वडील आपल्या मुलासोबत बोलणं करून देण्याचं रियाला सांगत आहेत. हे सर्व मेसेज गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : सीबीआय सुशांतच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवणार
सुशांतच्या वडीलांनी रियाला पाठवलेला मेसेज :
सुशांतचे वडील रियाला म्हणाले की, 'जेव्हा तुला कळालचं आहे की, मी सुशांतचा वडील आहे, तर माझ्याशी बोलली का नाहीस. नक्की काय आहे? मैत्रिण म्हणून त्याची काळजी घेत त्याचे उपचारही करत आहेस. त्यामुळे माझंही कर्तव्य आहे की, सुशांतबाबतची सर्व माहिती मला असली पाहिजे. त्यामुळे कॉल करून मला सगळी माहिती दे.'
एवढचं नाहीतर सुशांत सिंह राजपूतचे वडीलांच्या वतीने रियाची मॅनेजर श्रुती मोदीलाही मेसेज करण्यात आला होता. श्रुतीला केलेल्या मेसेजमध्ये सुशांतच्या वडीलांनी लिहिलं होतं की, 'मला माहिती आहे की, सुशांतची सर्व कामं तू पाहतेस. तो आता कोणत्या परिस्थितीत आहे, त्यासाठी बोलायचं होतं. काल सुशांतसोबत बोलणं झालं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी खूप अस्वस्थ आहे. आता तूच विचार कर की, एका वडीलांना त्यांच्या मुलाची किती चिंता असेल. त्यामुळेच तुझ्याशी बोलायचं होतं. आता तू बोलत नाहीस, त्यामुळे मला मुंबईला जायचं आहे.
फ्लाइटचे तिकीट पाठव.'
दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी रियावर आरोप लावला आहे की, रियानेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुशांतपासून दूर केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?
- दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण