Sushant Singh Rajput Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या सुनावणीआधी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये तिने स्वतः सोबत होणाऱ्या मीडिया ट्रायलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सुनावणी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार असून याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती विरोध करत आहेत. महाराष्ट्र सरकार मागणी करत आहे की, सीबीआच्या वतीने दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा.सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत मुंबई पोलिसांकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत करण्यात आलेल्या सुनावणीचा रिपोर्ट मागितला होता. तो पाहिल्यानंतर आणि सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट याप्रकरणी तपास कोण करणार, याचा निर्णय देणार आहे.



रियाने दाखल केले प्रतिज्ञापत्र


आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी रिया चक्रवर्तीने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. रियाने सांगितलं आहे की, पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआर कोणताही आधार नाही. हे एफआयआर मुंबईत ट्रान्सफर होऊ नये, म्हणूनच याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय असं करता येऊ शकत नाही. दरम्यान, रियाने हेदेखील सांगितलं की, जर सुप्रीम कोर्टाने आपल्या वतीने तपास सीबीआयकडे सोपवला, तर तिला कोणत्याही प्रकारची हरकत नाही.


रियाने सीबीआय आणि ईडीच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तिच्या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने सुशांतच्या बँक खात्यातून करण्यात आलेल्या देवाणघेवाणीची चौकशी सुरु केली आहे. तसेच सीबीआयनेही लगेच गुन्हा दाखल केला आहे. इतरही अनेक मोठी प्रकरणं आहेत, ज्यांचा तपास या एजन्सी करत नाहीत. परंतु, या प्रकरणी वेगाने दोन्ही एजन्सी काम करत आहेत.


मीडिया ट्रायलमुळे रिया हैराण


प्रतिज्ञापत्रात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलबाबत सांगण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं आहे की, 'मीडियाने रियाला आधीपासूनच दोषी ठरवलं आहे. याआधी 2जी आणि आरुषि तलवार केसमध्ये ज्या लोकांना मीडियाने आपल्याकडून दोषी ठरवलं होतं. ते सर्वजण निर्दोष सुटले. सुशांतनंतरही अनेक अभिनेत्यांनी आत्महत्या केली आहे. परंतु, मीडियाचा रस याच प्रकरणात जास्त आहे. हे प्रकरण सर्वांसमोर वेगळ्या रंगात मांडलं जात आहे. रिया आधीपासूनच हैराण आहे. अशातच तिच्या वैयक्तिक जीवनाचाही तमाशा मांडण्यात आला आहे.



स्वतःला सांगितलं राजकारणाचं शिकार


रियाने आपली राजकारणात गुरफटून शिकार झाल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली की, याप्रकरणी एवढ्या गोष्टी घडण्याचं एक कारण बिहारमध्ये होणाऱ्या निवडणूकाही आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी स्वतः याप्रकरणी रस दाखवला आहे. त्यानंतर पाटणा पोलिसांनी सुशांतच्या वडीलांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल केला आहे. कायद्याने असं करण्याचा पाटणा पोलिसांना कोणताही हक्क नाही.


याप्रकरणी सुप्रीम कोर्टात न्याय मागण्यासाठी सर्वात आधी रिया चक्रवर्ती पोहोचली होती. तिने पाटणात दाखल करण्यात आलेला एफआयआर मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बिहार सरकारच्या शिफारसीने दाखल करण्यात आलेला एफआयआर सीबीआयकडे सोपवण्यात आला. महाराष्ट्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयकडे अशाप्रकारे प्रकरण सोपवणं चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यांची मागणी आहे की, सीबीआयच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला मुंबई वांद्रे पोलीस स्ठानकात ट्रान्सफर करण्यात यावं. मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या :