मुंबई : सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी प्रवर्तन निदेशालयकडून मनी लाँडरिगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा तपास करत रिया चक्रवर्तीला 7 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिया चक्रवर्ती सोबतच सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाचा भाऊ शॉविक चक्रवर्ती या तिघांची चौकशी प्रवर्तन निदेशालयकडून करण्यात आली.


रिया काल जेव्हा चौकशीसाठी आली तेव्हा पहिला अर्धा तास तर तिने काहीही बोलण्यास नकार दिला. मी माझ्या वकिलासमोरच बोलेन अशी स्पष्टोक्ती रियाने अधिकाऱ्यांसमोर केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रियाला ही बाब लिखितमध्ये देण्यास सांगितलं. मात्र, जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांने कसून चौकशी केली, त्यावेळी रियाने उत्तर देण्यास सुरुवात केली. सर्वात आधी रियाने तिच्यावर मनी लाँडरिगचे लागलेले सर्व आरोप फेटाळले.


नेमके कुठले प्रश्न ईडीकडून रियाला विचारण्यात आले?




  • रियाचे दोन बँक खाती आहेत. त्या खात्यांमध्ये काही रक्कम आली. जेव्हा त्या पैश्यांबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी रियाला विचारलं, तेव्हा रियाने त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तरं दिली नसल्याची माहिती ईडी सूत्रांकडून मिळाली.

  • रियाचं वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये आहे आणि इतक्या कमी उत्पन्नामध्ये 2 महागडी घरं रियाने कशी घेतली? याचे उत्तर देखील रियाला नीट देता आलं नाही.

  • तर इतक्या कमी उत्पन्नामध्ये या दोन घरांवर रियालं लोन कसं मिळालं या प्रश्नाचे उत्तर देखील रियाला देण्यास अवघड गेलं.

  • सुशांतच्या अकाउंटमधून काही पैसे रियाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्या संदर्भात सुद्धा ईडीने रियाला प्रश्न विचारला. आणि या प्रश्नावर सुद्धा पुन्हा एकदा समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना मिळालं नाही.

  • सुशांत, रिया आणि रियाचा भाऊ शोविक हे कंपनीमध्ये पार्टनर होते, शोविकला सुशांतने पार्टनर का करून घेतलं या प्रश्नावर रिया म्हणाली की जेव्हा मी आणि सुशांत जवळ आलो त्यावेळेस शोविक आणि सुशांतची देखील ओळख झाली. शोविक आणि सुशांतमध्ये जवळीक निर्माण होऊन ते एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. त्यामुळे शोविकला पार्टनर करून घेण्याचा निर्णय हा सुशांतचाच असल्याचं रियाने सांगितलं.


SSR Suicide Case | रियाने मुंबईत घेतला 76 लाखांचा फ्लॅट, एकटीने भरली 45 टक्के रक्कम

सुशांतच्या अकाउंटमधून अवैधरित्या पैसे ट्रान्सफर
कंपनी मधील निवेशाबद्दल जेव्हा रियाला विचारण्यात आलं, त्यावेळेस ती म्हणाली की कंपनी ऑन पेपर होती. जेव्हा आम्ही 2019 च्या अखेरीस कामाला सुरुवात केली होती. तसेच सुशांतच्या अकाउंटमधून अवैधरित्या काही पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत का? आता याचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. रियाने किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणी असे अवैधरित्या पैसे ट्रान्सफर केले आहेत का? याचाही तपास ईडीकडून केला जात आहे.

SSR Suicide Case | सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही : गृहमंत्री अनिल देशमुख