मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता दिशा सालियनचा मृत्यू वेगवेगळ्या अँगलने जोडले जात आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की दिशा सुशांतची मॅनेजर नव्हती आणि सुशांतशी तिचे कोणतेही संबंध किंवा मैत्री नव्हती. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार दिशा कामाच्या संदर्भात केवळ 23 दिवस सुशांतच्या संपर्कात आली.


दिशा कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती आणि कंपनीने दिलेल्या कामासंदर्भात 1 एप्रिल 2020 ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत सुशांतच्या संपर्कात होती. यानंतर किंवा आधी सुशांत आणि दिशा यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही. दिशाची कंपनीतील लोक, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना विचारुन मुंबई पोलिसांनी ही माहिती मिळविली आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी दिशा आणि सुशांत दोघांचे फोन रेकॉर्ड तपासले आहेत, ज्यावरून हे दिसून येते की दोघांमध्ये केवळ व्यावसायिक संवाद होता आणि या दोघांमधील घडलेल्या गोष्टींचा हा पुरावा आहे, जो एबीपी माझा कडे exclusive उपलब्ध आहे.


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?


दिशा सालियनचा मृत्यू 8 जूनला झाला तर सुशांतचा मृत्यू दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी 14 जूनला झाला. दोघांचा मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगण्यात येतं आहे. मृत्युपुर्वी दोघांची दोन महिने आधी व्हाट्सअपवर चर्चा झाली होती.


1 एप्रिल 2020
सुशांतने दिशा सोबत व्हाट्सअप वर चर्चा केली. चर्चेत दिशाने सुशांतला स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एका तेलाच्या ब्रँडच्या प्रमोशनबाबत माहिती दिली.


दिशा सालियन - स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एका तेलाच्या कंपनीसाठी एक वर्ष ब्रँड अँबेसेडर व्हायचं आहे. 1 दिवसाचं शुटिंग असेल आणि अर्ध्या दिवसासाठी टिव्हीसीसाठी रेकॉर्डिंग. एका वर्षात सणाच्या कालावधीत डिजिटल माध्यमात तेलाशी संबंधीत 3 पोस्ट टाकाव्या लागतील.


प्लीज मला सांग.. यासाठी मी त्यांना 60 लाख रुपये सांगू का? याबाबत सल्ला देखील दे


सुशांत - ब्रँडचं नावं काय आहे?


दिशा - ते आत्ताच त्यांच्या ब्रँडचं नावं जाहीर करणार नाहीत. मला वाटतंय आपण ब्रँड कशाचा आहे. ते पाहून पुढील बोलणी करायला हवीत.


सुशांत - ओके...कुल..थँक्यू


तारीख 7 एप्रिल 2020 -

सुशांत आणि दिशामध्ये पब्जी गेमच्या प्रमोशन बाबत चर्चा झाली.


दिशा - हाय सुशांत....
पब्जी एक डिजिटल कँपेन करत आहे. ज्यामध्ये ते लोकांना संदेश देणार आहेत की घरात राहा, सुरक्षित राहा आणि पब्जी गेम खेळा. याबाबतचा एक व्हिडियो तुला इन्स्टाग्रामवर पोस्ट करावा लागेल. यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का? आपण यावर कम करु शकतो का?


जर तुम्हांला हे आवडलं तर मी पब्जी कंपनीला स्क्रिप्टबाबत बोलेल.


सुशांत- हो प्लीज!


दिशा - पब्जीला स्क्रिप्ट देण्याबाबत सांगत आहे.


तारीख 10 एप्रिल 2020..


दिशाने सुशांतला पब्जी कंपनीसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.


दिशा - हाय सुशांत
पब्जी कंपनीने कन्फर्म केलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता पब्जी कंपनीसोबत चांगली डील केली आहे. इन्स्टाग्रामला एक व्हिडियो पोस्ट करण्यासाठी ते 12 लाख रुपये सोबत टँक्सची रक्कम देण्यास ते तयार झाले आहेत.


मी त्यांना सांगितलं आहे, तुम्ही सांगितलेले बदल स्क्रिप्टमध्ये करावे लागतील. मी लवकरच याबाबत माहिती देते.


तारीख 12 एप्रिल 2020...


सुशांतने दिशाला उत्तर दिलं.
सुशांत - नक्कीच.. स्क्रिप्ट आली की आपण ठरवू यात.


दीशा - हो .... नक्कीच


7 एप्रिल ते 11 एप्रिलच्या दरम्यान सुशांत आणि दिशामध्ये पब्जी गेमच्या प्रमोशनबाबत चर्चा झाली. त्यानंतर पुढच्या दिवशी 12 एप्रिलला 15 एप्रिलला हॉट स्टारवर प्रसारित होणाऱ्या simpsons शोच्या प्रमोशन बाबत बातचीत झाली. दिशाने डीजनी प्लसचा व्हाट्सअप मेसेज सुशांतला फॉरवर्ड केला. ज्यामध्ये लिहिलं होतं कीं...


‘आम्ही simpsons च्या 31 भागांचे हॉटस्टार वर 15 एप्रिलला प्रिमियम करणार आहोत. याच्या प्रचारासाठी आम्हाला काही सेलिब्रिटीची गरज आहे. यामध्ये सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कार्टून बनवण्यात येणार आहेत. हे कार्टून simpsons च्या पद्धतीने बनवण्यात येतील. यामध्ये आम्ही सेलिब्रिटी आणि त्याच्या कुटुंबियांचे हसताना आणि साधे भाव असणारे कार्टून बनवणार आहोत. ते कार्टून सेलिब्रिटीला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन प्रसिध्द करायचे आहेत. हे प्रमोशन 15 एप्रिल पासून 30.एप्रिल पर्यंत करायचे आहे.’


डीजनी प्लसच्या या मेसेजबाबत दिशा सुशांतला म्हणाली की


दिशा - सुशांत डिजनी प्लसवाले Simpsons च्या प्रमोशनसाठी विचारत आहेत. यामध्ये तुम्ही आणि रिया मिळून ते एकत्र करु शकता का? प्लीज तुम्ही मला त्याबाबत सांगा. यासाठी त्यांना किती रुपये सांगू. तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.


सुशांत - नको....ही खूष करणारी बाब नाही.


सुशांतने लिहिलं होतं की ही बाब त्यांच्यासाठी रोमांचक नाही. त्यामुळे ते करण्यास तयार नाहित. यावरून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे की रिया असल्यामुळेच त्याला हे नको होतं का?


अशाप्रकारे, सुशांत आणि दिशा यांच्यामधील संवाद 23 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या ब्रँडच्या प्रमोशन, जाहिराती आणि इतर कामांसाठी चालू राहिले.


सोशल मीडियावर सुशांत आणि दिशा बद्दल बरीच चर्चा झाली होती. दोघांमध्ये अफेअर होत, दिशा गर्भवती होती, सुशांतला दिशाच्या मृत्यूविषयी माहिती होती. मात्र, त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.


दिशाच्या मृत्यूशी आपले नाव जोडण्यात येत असल्याने सुशांत नाराज होता


वास्तविक, दिशा कधीच सुशांतची मॅनेजर नव्हती, पण दिशाच्या निधनानंतर सर्वत्र अशी बातमी होती की सुशांतचा माजी मॅनेजर दिशाचा मृत्यू झाला. ज्यामुळे सुशांत खूप अस्वस्थ झाला होता. दिशाच्या निधनानंतर सुशांतने आपल्या काही परीचयाच्या लोकांना सांगितले होते, की त्याचे नाव दिशाच्या मृत्यूशी जोडले जाईल, नेगटीव आणि खोट्या बातम्या दिल्या जातील. दिशाच्या मृत्यूविषयी त्याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातील आणि त्याचा दिशाशी काही संबंध नसतानाही तो व्हायरल होईल, याबद्दल सुशांत खूप नाराज होता.


SSR Suicide Case | सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही : गृहमंत्री अनिल देशमुख