सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या आणि सुशांत बरोबर झालेल्या व्हाॅट्सअॅप चॅटच स्क्रीन शॉट शेयर केलं आहेत. या चॅटमध्ये सुशांत आणि त्याची बहिण प्रियांकासोबत असलेल्या नात्याबद्दल सुशांत बोलत आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे.
रियाने हा स्क्रीन शॉट माध्यमांबरोबर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांत रियाला सांगत आहे की, त्याची बहीण सुशांतचा रूम मेट आणि मित्र सिद्धार्थ पीठानेला भडकवत आहे. या चॅटची सुरुवात सुशांत रिया आणि त्याच्या भावाचे आभार मानन्यापासून करतो.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?
चॅटमध्ये सुशांत म्हणतो...
चॅटमध्ये सुशांत म्हणतो की, "तुझं कुटुंब खूप चांगलं आहे. शोविक आणि तू खूप दयाळू आहात. तू माझी आहेस आणि माझ्या बदल आणण्यासाठी तू योग्य आहेस. कारण तू मला जगा पलीकडचं समाधान देतेस. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासारखे लोक माझ्या अवतीभवती आहेत. आणि माझे मित्र म्हणून मला आनंद देत आहात.
रियाची स्तुती...
पुढील चॅटमध्ये सुशांत रियाला म्हणतो की, "तू हसत राहा अशीच छान दिसतेस, आता मी झोपण्याचा प्रयत्न करतो, अपेक्षा करतो की मला सुद्धा जमीलासारखे स्वप्न यावे, किती अद्भुत असेल हे? याच्या उत्तर देताना रिया म्हणते "हा हा... झोप माझ्या गोड मुला, फ्लाईट लॅन्ड केल्यानंतर मी कॉल करेन,अपेक्षा आहे तोपर्यंत तू चंद्रावर लॅन्ड करशील, झोप स्वीट बाबा बॉय"
सिद्धार्थ पीठानीला भडकवत होती प्रियंका...
नंतर रियाने सुशांतची विचारपूस करण्यासाठी मेसेज केला त्यावर सुशांत ने रिप्लाय दिला. "मी बरा नाही . माझी बहिण सिड भाईला भडकवत आहे, कारण या सर्व गोष्टींवरून दुर्लक्षित करून सर्व काही माझ्यावर यावं की मी त्यांना फिजिकल पनिशमेंट दिली आहे. ही खूप उदास करणारी बाब आहे.."
विक्टिम कार्ड खेळत होती बहीण...
सुशांत पुढे लिहतो की,(प्रियांकासाठी) दारूच्या नशेत छेडछाड करून तू विक्टिम कार्ड खेळून लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. माझी लाडकी बहीण, तिथे आपली आई आहे आणि देव आहेत .ज्यांनी मला शिकवला आहे आणि त्या शिकवणी प्रमाणे तू एक गुन्हा केला आहेस. तुला तुझ्या अहंकारात काही दिसत नसेल तर देव तुझ भलं करो आणि मी घाबरत नाही यापुढेही मी तेच करेन जे आतापर्यंत केलं आहे, मी जगात बदल आणत राहीन देव आणि प्रकृतीला हा निर्णय करू दे की कोण बरोबर आहे.
दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण