मुंबई : गाजलेली वेब सीरिज मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनची सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिर्झापूर 2 लवकरच चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. मिर्झापूर उत्तर प्रेदशातील मिर्झापूरवर आधारित आहे. वेब सीरिजमधील प्रत्येक एपिसोड रोमांचक होता. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं.
मिर्झापूरचा दुसरा सीझन पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पहिल्या सीझनमध्ये उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत. मिर्झापूर सीरीज 2 वेब सीरीजमध्ये गुड्डू पंडितचा पुन्हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु, चाहत्यांना त्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. मिर्झापूर 2 चा नवा सीझन 25 नोव्हेंबर रोजी येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी मिर्झापूर सीझन 2 अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात येणार आहे. दरम्यान, या सीरिजचा पहिला सीझन 16 नोव्हेंबर 2018मध्ये रिलीज करण्यात आला होता.
मिर्झापूर 2 ची शुटिंग खूप आधीच पूर्ण झाली होती. परंतु, लॉकडाऊनमध्ये पोस्ट प्रोडक्शनचं काम थांबलं होतं. यामध्येच बॉलिवूड अभिनेता अली फजल याच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे तो आपल्या डबिंगचं काम करू शकला नाही. आता सीरीजमधील सर्व कलाकारांनी डबिंगचं काम सुरु केलं आहे.
रसिका दुग्गल नव्या अंदाजात
मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठी हे पात्र साकारणाऱ्या रसिका दुग्गलने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्मी जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनबाबत बोलताना रसिका म्हणाली की, 'ज्यांनी मिर्झापूरचा पहिला सीझन पाहिला आहे, त्यांना सीझन 2 नक्कीच आवडेल. यामध्ये नवे कॅरेक्टर्स लिहिले गेले आहेत. अनेक चांगले अॅक्टर्स हे कॅरेक्टर्स साकारणार आहेत. बीना त्रिपाठीचा एक वेगळा अँगल सीझन 2 मध्ये पाहता येणार आहे. सीझन 1 मध्ये त्या कॅरेक्टरसोबत अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्या प्रभावही या कॅरेक्टरवर पडला आहे.' त्यामुळे बीना त्रिपाठी कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'डेंजरस' चित्रपटाच्या पोस्टर्सनी वातावरण तापलं
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; मीडिया ट्रायल विरोधात रियाची याचिका
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन