नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार, मुंबई पोलीस की सीबीआय यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकतं. आज सर्व पक्षकार सुप्रीम कोर्टात लेखी स्वरुपात युक्तिवाद मांडतील. त्यानंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करायचा की मुंबई पोलिसांनी हे सुप्रीम कोर्टाला ठरवायचं आहे.


सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (11 ऑगस्ट) या प्रकरणी आपला आदेश सुरक्षित ठेवून सर्व पक्षकारांना आपला युक्तिवाद लेखी स्वरुपात जमा करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती यांनी सीबीआयच्या वतीने दाखल एफआयआर मुंबई पोलिसांना सोपवण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचा विरोध केला आहे.


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला


मंगळवारी कोर्टात काय झालं?


1. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तिन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला होता


2. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडताना अभिषेक मनु सिंघवी यांनी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरु असल्याचं म्हटलं.


3. रियाचे वकील श्याम दिवाण यांनी कुठलाही निर्णय देण्याआधी कायद्याप्रमाणे केस मुंबईला शिफ्ट करा अशी मागणी केली आहे.


4. तर बिहार सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहतां यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.


महत्त्वाच्या बातम्या :