नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सुनावणी पूर्ण झाली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला. न्यायालयाने सर्व पक्षांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी म्हटलं की, सीआरपीसी CrPC 174 अंतर्गत सुरू झालेल्या घटनेच्या मृत्यूची चौकशी फारच थोड्या काळासाठी सुरु राहते. मृतदेहाकडे पाहून आणि घटनास्थळी जाऊन मृत्यूचे कारण संशयास्पद आहे की नाही हे पाहिलं जातं. मग FIR नोंदवला जातो. मुंबई पोलिस जे करत आहेत ते योग्य नाही.
यापूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले की सुशांतला कुटुंबापासून दूर केलं जात होतं. सुशांतच्या वडिलांनी वारंवार विचारले होते की सुशांतवर काय उपचार सुरु आहेत. मला तिथे येऊ द्या. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात अनेक बाबी तपासण्यायोग्य आहेत. असे दिसते आहे की गळ्यातील खुणा बेल्टच्या होत्या. पंखावरून लटकलेला मृतदेह कोणाला दिसला नाही.
ते म्हणाले, “मीडिया रिपोर्टच्या आधारे समोरिल बाजूकडून युक्तिवाद सुरु आहे. मात्र आम्ही तस होऊ देणार नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मुलगाही सहभागी असल्याचे मीडिया सांगत आहे. पण यावर मला काही सांगायचे नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?
- दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण