एक्स्प्लोर

Surya Official Trailer: ‘सुर्या’ मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण; ट्रेलर पाहिलात?

‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या ‘सुर्या’ या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

Surya Official Trailer: अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट 6 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. असत्याविरुद्ध सत्याचा लढा, त्याला नायक-नायिकेच्या प्रेमाची फोडणी ‘मनोरंजनाचं पॅकेज’ असलेल्या ‘सुर्या’ या चित्रपटातून प्रेमाचा त्रिकोण ही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.

सळसळत्या रक्ताचा आणि तळपत्या ज्वालांचा अंगार.. 'सुर्या'… अशा जबरदस्त टॅग लाईनसह प्रसाद मंगेश हा नवोदित अभिनेता या चित्रपटात नायकाच्या रूपात आपला धमाका दाखविण्यास सज्ज झाला आहे. अॅक्शनने ठासून भरलेला' ‘सुर्या’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग ‘सुर्या’ आलेल्या संकटावर कशी मात करतो याची रंजक कथा दाखवतानाच मैत्रीचं अबोल नातं जपणारी रिया आणि सुर्याच्या प्रत्येक लढ्यात त्याची ढाल बनून राहणारी काजल या दोघींच्या प्रेमाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. या तिघांसोबत हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. अॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस आहेत.या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4 : कोण ठरणार 'बिग बॉस मराठी'चा विजेता? 'या' स्पर्धकांची फिनालेमध्ये एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai : घाटकोपरमधील 41 झाडांवर विषप्रयोग, जाहिरातींच्या होर्डिंगसाठी वृक्षांची हत्या केल्याचा संशयPM Modi on Rahul Gandhi  : राहुल गांधी वायनाडमधून बाहेर पडणारAmol Kolhe Shirur : अमोल कोल्हेंचा जोरदार प्रचार, सत्ताधाऱ्यांवर जनता मतातून उपचार करेल :अमोल कोल्हेAjit Pawar Baramati : सर्व संस्था साहेबांनी काढल्या, मग आम्ही काय ... ? बारामतीत अजित पवारांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
माढ्यात उत्तम जानकरांचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांची भेट अन् 6 महिन्यांपूर्वीचं प्लॅनिंगच भरसभेत सांगितलं
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, विद्यमान आमदाराचा राजीनामा
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
Raver Loksabha : संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
संतोष चौधरींच्या नाराजीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; रावेरमधील बंड थंड होणार?
Telly Masala : IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री ते देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण?; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
लखनौचा विजय अन् केएल राहुलची जबरदस्त खेळी; पत्नी अथियाने 3 शब्दात व्यक्त केली भावना!
Embed widget