Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर
सनी देओलनं (Sunny Deol) गदर (Gadar) चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
![Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर sunny deol ameesha patel movie gadar 2 poster release date announce Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/cceb55fe90cbed59a21cabbb2704eba91674717020745259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gadar 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हँड पंम्प' सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अमिषानं या चित्रपटात सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं गदर चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सनी देओलनं सोशल मीडियावर गदर-2 (Gadar 2) या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
सनी देओलची पोस्ट
सनी देओलनं सोशल मीडियावर गदर-2 चं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा! आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार आहे.' सनीच्या या पोस्टला कमेंट करुन त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल शर्मा हे गदर-2 चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
View this post on Instagram
गदर या चित्रपट 19 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकरांची विशेष पसंती मिळाली. गदर चित्रपट रिलीज होऊन 22 वर्ष झाली आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओज निर्मित, या चित्रपटात पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिना अर्थात सुपरस्टार सनी देओल, अमिषा पटेल यांची जोडी पाहायला मिळणार आहे.
बॉर्डर, गदर, अर्जुन, सल्तनत, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, अपने, यमला पगला दिवाना यांसारख्या चित्रपटांमध्ये सनी देओलनं काम केलं आहे. सनी देओलचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)