एक्स्प्लोर
सेन्सॉर बोर्डाच्या जाचामुळे अनेक सिनेमांचे नुकसान: सुनील शेट्टी

नागपूर : सेन्सॉर बोर्डाच्या जाचामुळे अनेक चित्रपटांचे नुकसान होत असून, त्याचा परिणाम हा त्या चित्रपटावर व त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांवर होत असल्याचे मत अभिनेते सुनील शेट्टी याने व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमासाठी अभिनेते सुनील शेट्टी नागपुरात आले होते. उडता पंजाब चित्रपटाला यांचा चांगलाच फटका बसला असून त्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिला असून न्यायालयापुढे कुणी मोठा नाही. अश्यात प्रत्येकाच्या हातात रिमोट आहे ज्याला जे बघायचे आहे तो ते पाहू शकतो. आणि न्यायालयाच्या निर्णया मुळे आपण खुश असल्याचे देखील त्याने सांगितले. दरम्यान, सलमान खानला आपण चांगल्याने ओळखत असून, सलमान खान अनेक चांगले काम करत असून त्याच्या चांगल्या कामाची दखल घेतल्या जात नसल्याचे त्याने म्हटले आहे. सलमानला बोलायचे वेगळे होते. मात्र मीडियाने स्वतःच्या टीआरपीसाठी त्याच्या व्यक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत या गोष्टीचे खापर प्रसिद्धी माध्यमांवर फोडले आहे. बोलण्यात चुकी झाली असेल शेवटी सलमान देखील माणूस आहे आणि चुका माणसाकडूनच होतात असे सांगत या विषयी सुनील शेट्टीने सलमानची पाठराखण केली.
आणखी वाचा






















