(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Phulrani Movie : दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुबोध भावेची 'फुलराणी'
Phulrani Movie : 'फुलराणी....अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा मराठी चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Phulrani Movie : सुबोध भावेच्या आगामी 'फुलराणी' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. 'फुलराणी....अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा मराठी चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विश्वास जोशींनी केले आहे. प्रेक्षकांनी नाटकातील फुलराणीवर प्रचंड प्रेम केलं. परंतु, चित्रपटातील फुलराणी कशी असणार? कोण असणार? याबाबात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
फुलराणी सिनेमा येत्या दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'फुलराणी' सिनेमात सुबोध भावे पहिल्यांदाच एका आगळ्या-वेगळ्या रोमॅंटिक भूमिकेत दिसून येणार आहे. सुबोध भावेने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"नवीन वर्ष, नवीन संकल्प. सुबोध भावेची एक आगळी वेगळी भूमिका असलेला 'फुलराणी - अविस्मरणीय प्रेमकहाणी' दिवाळीत होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित!"
View this post on Instagram
चित्रपटातील इतर कलाकारांची नावे तसेच 'फुलराणी'ची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रेमाचा अविस्मरणीय अविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हर्षवर्धन साबळे, जाई जोशी, अमृता राव या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारित असलेला, 1964 साली प्रदर्शित झालेला 'माय फेअर लेडी' हा म्युझिकल सिनेमा चांगलाच गाजला होता. याच 'पिग्मॅलिअन' कलाकृतीने प्रेरित झालेला 'फुलराणी…अविस्मरणीय प्रेमकहाणी' हा मराठी सिनेमा आहे.
संबंधित बातम्या
Kitchen Kallakar : पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदेंसोबत रंगणार 'किचन कल्लाकार'चा आगामी भाग
Nakuul Mehta : अभिनेता नकुल मेहतानंतर त्याच्या 11 महिन्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha