Amala Paul : दाक्षिणात्य अभिनेत्रीला केरळमधील मंदिरात प्रवेश नाकारला; भावना व्यक्त करत म्हणाली, 'धार्मिक भेदभाव'
अमाला पॉलने (Amala Paul) आरोप केला आहे की, "धार्मिक भेदभावामुळे" तिला केरळमधील (Kerala) मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले.
Amala Paul: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला (Amala Paul) केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. अमाला पॉलने आरोप केला आहे की, "धार्मिक भेदभावामुळे" तिला केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले.
अमाला पॉल ही सोमवारी (16 जानेवारी) मंदिरात दर्शनासाठी गेली होती. असं म्हटलं जात आहे की, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी प्रथेबाबत सांगितले की, या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच परवानगी आहे. त्यामुळे अमालाला दर्शन घेण्यापासून रोखले. अमाला पॉलने असा आरोप केला आहे, की मंदिर प्रशासन अधिकारऱ्यांनी तिला मंदिरात प्रवेश घेऊ दिला नाही, त्यामुळे तिला मंदिरासमोरील रस्त्यावरुनच दर्शन घ्यावे लागले.
अमालानं मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिला अनुभव
मंदिरामध्ये प्रवेश न मिळाल्याने अमालाने तिच्या या अनुभवाबद्दल मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिलं आहे. 'देवीला न पाहता देखील ती माझ्या अजूबाजूला आहे, असं मला वाटलं. 2023 मध्ये धार्मिक भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे, हे पाहून दुःख आणि निराशा वाटली. मी देवाजवळ जाऊ शकले नाही पण दुरुनच ते अजूबाजूला असल्याचं जाणवलं. मला आशा आहे की, या धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. वेळ येईल आणि आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल."
View this post on Instagram
मंदिर प्रशासनावर उपस्थित झाले प्रश्न
अमाला पॉलला मंदिरात प्रवेश न मिळाल्याने आता तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर ट्रस्टच्या प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाने सांगितले की, ते फक्त प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. ट्रस्टचे सचिव प्रसून कुमार म्हणाले, "मंदिरात इतर अनेक धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, जेव्हा एखादी सेलिब्रिटी येते तेव्हा चर्चा होते."
कोण आहे अमाला पॉल?
अमाला पॉलने मल्याळम, तेलूगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मैना, इथु नमुदे कथा, मुप्पोझधुम अन कर्पनैगल आणि रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांमध्ये अमालाने प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Jaya Bachchan: 'अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे'; फोटोग्राफरवर पुन्हा भडकल्या जया बच्चन