Dil Dimag Aur Batti : सोनाली कुलकर्णी दिसणार 'दिल दिमाग और बत्ती' सिनेमात, पोस्टर रिलीज
Dil Dimag Aur Batti : 'दिल दिमाग और बत्ती' हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
![Dil Dimag Aur Batti : सोनाली कुलकर्णी दिसणार 'दिल दिमाग और बत्ती' सिनेमात, पोस्टर रिलीज Sonali Kulkarni to appear in movie Dil Dimag Aur Batti Poster Release Dil Dimag Aur Batti : सोनाली कुलकर्णी दिसणार 'दिल दिमाग और बत्ती' सिनेमात, पोस्टर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/34b98f8f2b1c2157d4bac5a0519c4bca_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dil Dimag Aur Batti : 'दिल दिमाग और बत्ती' (Dil Dimag Aur Batti) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे हटके पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) मुख्य भूमिकेत असणार आहे.
सोनाली कुलकर्णीचा 'दिल दिमाग और बत्ती' हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 80 - 90 च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांच्या पोस्टर्सची आठवण करून देणारे आणि तारे तारकांनी भरलेले सिनेमाचे धमाल पोस्टर फारच लक्षवेधी आहे. या पोस्टरमुळे रसिकांच्या मनात या सिनेमाबद्दल उत्कंठा वाढली आहे.
View this post on Instagram
हृषीकेश गुप्ते हे 'दिल दिमाग और बत्ती' या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. तर या सिनेमात हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी स्वरसाज चढवला आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
The Kashmir Files : काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणाऱ्या 'द कश्मीर फाइल्स'चा दुसरा ट्रेलर आऊट
Mission Majnu : 'मिशन मजनू' सिनेमाची रिलीज डेट ठरली, Siddharth malhotra अॅक्शन मोडमध्ये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)