Sonali Bendre : मराठमोळ्या सोनालीला प्रपोज करणार होता पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर, अभिनेत्री म्हणाली, त्यावेळी...
Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीने नुकतच शोएब अख्तरसोबतच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. अभिनेत्री काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊयात.
Sonali Bendre : सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) 30 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. 'आग' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सोनालीने अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपली छाप सोडली. देशातच नाही तर देशाबाहेरही सोनीलीच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. मागील अनेक दिवसांपासून शोएब अख्तरसोबत (Shoaib Akhtar) सोनीला बेंद्रचं नाव जोडलं जात होतं. इतकच नव्हे तर, शोएब अख्तरने सोनाली बेंद्र मला खूप आवडते असंही म्हटलं असल्याचं सांगण्यात येत होतं. दरम्यान आता या सगळ्यावर सोनीलाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सोनाली बेंद्रेने नुकतीच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये शोएब अख्तरच्या सोबतच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. याचदरम्यान सोनाली बेंद्रेचे पाकिस्तानमध्ये किती चाहते आहेत याचीही चर्चा झाली. तसेच भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने सोनीलीचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. पण शोएब अख्तरने असं काही म्हटलं असेल, यावर सोनालीने संशय व्यक्त केला आहे. नेमकं सोनाली काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊयात.
सोनालीने नेमकं काय म्हटलं?
या प्रश्नाचं उत्तर देताना सोनालीने म्हटलं की, मला नाही माहित यामध्ये किती तथ्य आहे. कारण त्यावेळी अनेक अफवा पसरल्या जात होत्या. त्यामुळे सोनालीने शोएब अख्तरसोबतच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आता या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे,याबाबत आजही अनेकांना संभ्रम आहे.
अशी झाली सोनालीच्या करिअरला सुरुवात
सोनाली एक मॉडेल होती. तिने 1994 मध्ये 'आग' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्या वेळी ती फक्त 19 वर्षांची होती. 'हम्मा हम्मा' या गाण्याने तिला देशभरात ओळख मिळाली. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिने फिल्ममेकर गोल्डी बहलशी लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. 2018 मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. 2021 मध्ये त्यांनी धैर्याने या आजारावर मात केली.
View this post on Instagram