Alka Yagnik : मोठी बातमी : अलका याज्ञिक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त
Alka Yagnik : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही.
Alka Yagnik : प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक (Alka Yagnik ) यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे.
अलका याग्निक यांनी म्हटले की, एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यांना काही ऐकू येईनासं झालं असं त्यांनी म्हटले. हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे, सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस असं निदान डॉक्टरांनी केले आहे. कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटले. त्यामुळे मोठ्याने हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असे आवाहनही त्यांना केले आहे.
View this post on Instagram
अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत. गायक सोनू निगम, गायिका-अभिनेत्री इला अरूण यांनीदेखील अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली आहेत. अगर तुम चाहो,परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
अलका याग्निक यांनी काय म्हटले?
अलका याग्निक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “माझ्या डॉक्टरांनी मला विषाणूंच्या संसर्गाने रेयर सेंसरी न्यूरो नर्व हियरिंग लॉस झाल्याचे निदान केले आहे… या अचानक झालेल्या आजाराने मला धक्का बसला आहे. या आजाराशी आणि त्यातून आलेल्या नव्या परिस्थितीशी मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे अलका याग्निक यांनी सांगितले.
माझ्या चाहत्यांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी एक विनंती करत असून त्यांनी मोठ्या आवाजात हेडफोन लावून गाणी, संगीत ऐकू नये असे आवाहनही अलका यांनी केले. एक दिवस मी माझ्या व्यावसायिक जीवनामुळे माझ्या आरोग्याला झालेल्या हानीबद्दल देखील संवाद साधेल. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याने, मी माझे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करून लवकरच तुमच्याशी संवाद साधण्यास उत्सुक असून या आव्हानात्मक काळात तुमचा पाठिंबा, प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे अलका याग्निक यांनी म्हटले.
अलका यांनी केला हा रेकॉर्ड
टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या जगातील सर्वात प्रसिद्ध गायकांना मागे टाकत अलका यांनी यूट्यूबवरील स्ट्रिम चार्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 2022 मध्ये नेटकऱ्यांनी अलका यांची गाणी सर्वाधिक ऐकली.