(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Siddhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला प्रकरणात मोठी अपडेट; तीन शूटर्सना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Siddhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला प्रकरणातील तीन शूटर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Siddhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Siddhu Moose Wala) हत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या शूटर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दीपक मुंडी, कपिल पंडित आणि राजिन्दर अशा तीन शूटर्सला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पश्चिम बंगालमधून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्यांमध्ये दीपक मुंडीचादेखील समावेश होता. आता शूटर्सना पकडण्यात पंजाब पोलिसांना यश आलं आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यापासून दीपक मुंडी, कपिल पंडित आणि राजिन्दर गुजरातला पळून गेले होते. शूटर्सना पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी 'ऑपरेशन मुंडी' राबवलं होतं. याआधी पोलिसांनी आणखी तीन शूटर्सना ताब्यात घेतलं आहे.
सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधील आप सरकारनं 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.
In a major breakthrough, Punjab Police, in a joint operation with central agencies & Delhi Police, arrested Deepak alias Mundi, absconding shooter of Sidhu Moose Wala, with 2 associates - Kapil Pandit & Rajinder: Gaurav Yadav, DGP Punjab Police pic.twitter.com/Cx6ftLmLu7
— ANI (@ANI) September 10, 2022
पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धू मुसेवाला लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी ट्रॅक्टरवर शूट केली होती.
संबंधित बातम्या