एक्स्प्लोर
श्वेता बच्चनच्या डिझायनर ब्रँडवर कॉपी केल्याचा आळ
बिग बींची कन्या श्वेता बच्चन नंदा यांनी फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंगच्या साथीने सुरु केलेल्या 'एमएक्सएस' (MXS) या ब्रँडवर कॉपी केल्याचा आरोप होत आहे.
मुंबई : अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदा यांनी नुकतंच फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंगच्या साथीने श्वेता यांनी सुरु केलेल्या 'एमएक्सएस' (MXS) या ब्रँडवर कॉपी केल्याचा आरोप होत आहे.
एक सप्टेंबरला 'एमएक्सएस' ब्रँडने थाटामाटात लाँचिंग केलं. त्यानंतर अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर या ब्रँडचे हूडी घालून फोटो शेअर केले. मात्र फोटोत हूडीवर असलेला फाँट पाहताच सोशल मीडियावर अनेकांचे डोळे विस्फारले.
'गर्ल पॉवर' असं लिहिलेल्या एका हूडीचा फाँट 'पॉवरपफ गर्ल्स' या गाजलेल्या कारटूनमधील फाँटशी प्रचंड मिळताजुळता असल्याचं काही जणांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं.
त्याशिवाय, एका कमी प्रसिद्ध अमेरिकन ब्रँडच्या स्वेटशर्टवरील फाँट आणि मजकुराचंही श्वेताच्या ब्रँडमधील कपड्यावरील मजकुराशी साधर्म्य आहे. त्यामुळे श्वेता नंदा चोरीच्या आळावर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement