Shubhman Gill: सारा आली खानसोबत डेटिंगच्या चर्चेवर क्रिकेटपटू शुभमन गिलनं सोडलं मौन; म्हणाला...
आता सारासोबतच्या (Sara Ali Khan) डेटिंगच्या चर्चेवर शुभमननं (Shubhman Gill) मौन सोडलं आहे. एका चॅट शोमध्ये शुभमननं केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधलं.
Shubhman Gill: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. काही दिवसांपूर्वी सारानं कॉफी विथ करण (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबाबत सांगितलं होतं. पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सारा अनेकदा क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) स्पॉट झाली आहे. आता सारासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर शुभमननं मौन सोडलं आहे.
काया म्हणाला शुभमन
शुभमन गिलनं प्रीती आणि नीती सिमोज यांच्या 'दिल दिया गल्ला' लोकप्रिय पंजाबी चॅट शोमध्ये हजेरी लावली. हा शो सोनम बाजवा होस्ट करत आहे. शोमध्ये क्रिकेटरला विचारण्यात आले की, 'बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे?; क्षणाचाही विलंब न करता शुभमनने लगेच साराचे नाव घेतले.
पुढे त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू साराला डेट करतोय का?' या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, 'सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.' शुभमनच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. साराचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जातं. साराच्या आधी सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकरसोबत देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. तर सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती. अजून सारा आणि शुभमन यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण आता शुभमन आणि सारा यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
साराचे आगामी चित्रपट
साराचा 'गॅसलाइट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल,सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sara Ali Khan : 'या' क्रिकेटरला डेट करतीये सारा? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रंगल्या चर्चा