Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Shruti Haasan : सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीचं ब्रेकअप झालं असून तिने आता तिच्या बॉयफ्रेंडपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
Shruti Haasan : अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) ही नुकतीच फॅमिली स्टार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांची मुलगी आहे. श्रुतीच्या सालार या सिनेमाने तिला खूप प्रसिद्ध मिळाली. पण सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
रिपोर्टनुसार, श्रुती हासन आणि शंतनू हजारिका यांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्याचप्रमाणे अनेक वर्ष ते दोघे लिव्ह इनमध्येही राहत होते. पण जवळपास मागील महिन्याभरापासून ते वेगळे राहत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
सोशल मीडियावरुन केल एकमेकांना अनफॉलो
मागील काही महिन्यांमध्ये श्रुती सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. पण काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरही सक्रिय नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शंतनू आणि तिने सोशल मीडियावरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच त्यांनी त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो देखील डिलीट केल्याचं पाहायला मिळतंय.
मला नात्यांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा हवाय - श्रुती हासन
दरम्यान श्रुतीने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रिलेशनशिप या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना देखील दुजोरा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. ओपन रिलेशनशिप या मुद्द्यावर भाष्य करताना श्रुती म्हणाली की, जर एखाद्या नात्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे, ते तुमच्यासाठी चांगलं असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे. पण मला असं वाटतं की, तुमच्या पार्टनरला जसं हवं तसं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला गृहित धराल. माझ्याबाबतीत असं झालं तर मला ते चालणार नाही. मी नात्यांमध्ये खूप प्रमाणिक आहे आणि विश्वासार्ह आहे आणि मला असंच कोणीतरी हवंय. तुम्ही जर असे नसाल तर ठिक आहे, काही हरकत नाही.
श्रुतीचे रिलेशनशिप्स
श्रुती आणि शंतनू हे दोघे 2020 पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याआधी श्रुती अभिनेता मायकेल कॉर्सेलला डेट करत होती. पण तिचं तेही नातं फार काळ टिकलं नाही. पण शंतनू आणि तिच्या नात्याविषयी ओरीच्या एका कमेंटमुळे बरीच चर्चा झाली होती. ऑरीने रेडिट या प्लॅटफॉर्मवर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना शंतनूचा नवरा असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.