एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार 'भारताची फुलराणी'
मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. स्वत: श्रद्धा कपूरने याबाबत इन्स्टाग्रामवर माहिती दिली.
प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 'तारे जमीं पर' या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे.
स्वत:च्या आयुष्यावरील सिनेमाबाबत बोलताना सायना म्हणाली, "मला माहित होतं की, माझ्या आयुष्यावर सिनेमा बनवला जातो आहे. मात्र, माझी भूमिका कोण करत आहे, हे माहित नव्हतं. त्यामुळे श्रद्धा कपूर माझी भूमिका साकारणार असल्याचं कळल्यावर आनंद झाला आहे. श्रद्धा खूप सुंदर आणि मेहनती आहे. मला पूर्ण खात्री आहे की, श्रद्धा अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारेल."
सायना पुढे म्हणाली, "आनंदाची बाब म्हणजे, श्रद्धा माझी जवळची मैत्रिण आहे. सिनेमात उपयोगी पडतील, अशा बॅडमिंटनबाबत तिला नक्की टिप्स देईन. अनेकांनी माझी स्तुती करताना म्हटलं आहे की, तू श्रद्धा कपूरसारखी दिसतेस. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."
"सायना नेहवाल जगातील टॉप बॅडमिंटनपटूंपैकी एक आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजते की, मला सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळते आहे.", असे श्रद्धा कपूर म्हणाली.
दरम्यान, श्रद्धा कपूर सध्या 'हसीना' नामक एका बायोपिकमध्ये काम करत आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, नाहिद खान निर्माते आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवर या सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement