Ashwattha : लोकेश गुप्तेच्या आगामी 'अश्वत्थ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात; लवकरच सिनेमा होणार प्रदर्शित
Ashwattha : लोकेश गुप्तेचा 'अश्वत्थ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Ashwattha : 'अश्वत्थ' (Ashwattha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आजपासून पुण्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
लोकेश गुप्तेने सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्याची माहिती देणारा बाप्पासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"सुरुवात...बाप्पाच्या आर्शीर्वादाने 'अश्वत्थ'चे चित्रीकरण पुण्यामध्ये सुरू...गणपती बाप्पा मोरया...". या पोस्टरवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते लोकेशला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'अश्वत्थ' या सिनेमाच्या माध्यमातून लोकेश पत्नी चैत्रालीसोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
View this post on Instagram
मराठीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी 'अश्वत्थ' या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा येत्या हिवाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्याने स्वप्नीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय श्लोकावर आधारित आहे.
'अश्वत्थ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील लोकेश गुप्ते सांभाळत आहे. 'एबी आणि सीडी', 'एक सांगायचंय', 'ऋणानुबंध', 'डेटभेट' आणि 'मुंगळा' यांसारख्या दर्जेदार सिनेमांत लोकेशनं काम केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. हा सिनेमा 2022 च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
स्वप्नील जोशीचा ‘अश्वत्थ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; टीझर प्रदर्शित
Lokesh Gupte : लोकेश गुप्तेची नवी इनिंग; निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
