Lokesh Gupte : लोकेश गुप्तेची नवी इनिंग; निर्मिती क्षेत्रात करणार पदार्पण
Lokesh Gupte : लोकेश गुप्ते लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
Lokesh Gupte : मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ता (Lokesh Gupta) लवकरच नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम केल्यानंतर लोकेश आता त्याची पत्नी चैत्रालीसोबत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
लोकेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याची माहिती दिली आहे. मनोरंजन फिल्म कंपनी असे लोकेशच्या निर्मिती संस्थेचे नाव आहे. लोकेश गुप्तेने आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच के.के.मेनन यांच्या 'एक सांगायचयं' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील लोकेशने सांभाळली आहे.
View this post on Instagram
लोकेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"1997 साली व्यावसायीक रंगभूमीवर पहीलं पाऊल टाकत मुंबई गाठली आणि मनोरंजन क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. मायानगरी मुंबईतल्या या प्रवासाला या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. या प्रवासात भेटलेल्या प्रत्येकाने, रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, आपलंसं केलं.. आज तुमच्या याच प्रेमापोटी 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा एका नविन प्रवासाला सुरुवात करतोय..निर्मिती क्षेत्रात पदार्पण...मनोरंजन फिल्म कंपनी"
संबंधित बातम्या