एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वरुण धवनचा 'ऑक्टोबर' मराठी चित्रपटाची कॉपी?

हेमल त्रिवेदी नावाच्या एका निर्माता-एडिटरने फेसबुकवर शूजित सरकारवर चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री बनिता संधू स्टारर 'ऑक्टोबर' सिनेमाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. शूजित सरकारचा 'ऑक्टोबर' हा चित्रपट मराठीतील 'आरती-द अननोन लव्ह स्टोरी' या सिनेमाची कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा 18 ऑगस्ट 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. हेमल त्रिवेदी नावाच्या एका निर्माता-एडिटरने फेसबुकवर शूजित सरकारवर चित्रपट चोरल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "शूजित सरकारने सारिका मेने यांचा मराठी चित्रपट 'आरती- द अननोन लव्ह स्टोरी' चोरला आहे. सारिका मेने यांचा भाऊ सनी याच्या खऱ्या आयुष्यावर 'आरती' सिनेमा बेतला आहे. शूजित सरकारने चित्रपटाची कथा, पटकथाच नाही तर ओरिजनल फिल्मधील सीन्स आणि लूकही हूबेहूब कॉपी केले आहेत. ऑक्टोबरच्या दिग्दर्शकांनी मराठी फिल्मचे राईट्स कधीच मागितले नाहीत. शिवाय आरतीच्या निर्मात्या सारिका मेने यांच्याशीही कधी संपर्क साधला नाही. शूजित सरकारच्या या कृत्यामुळे सारिका एवढी खचली आहे की, ती सुसायडल केस झाली आहे. मागील काही दिवसात ती देशातील अनेक संस्थांमध्ये गेली, पण कोणीही तिची मदत केली नाही. न्याय मिळवण्यासाठी तिने दोन लाख रुपयेही खर्च केले आहेत. सारिका एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आरती चित्रपट बनवण्यासाठी तिने आपलं घरही विकलं. कायदेशीर कारवाईचा खर्च करण्यासाठी ती सक्षम नाही. हा सिनेमा हिंदीत बनवण्यासाठी मी 40% हक्क घेतले होते. गाण्यांचं संगीत आणि पटकथा लिहिण्यासाठीही गुंतवणूक केली होती. आम्ही 'आरती - द अननोन लव्ह स्टोरी'चं हिंदी व्हर्जन बनवणार होतो. पण त्याआधी 'ऑक्टोबर' प्रदर्शित झाला. आम्हाला न्याय हवा. मी या लढाईत सारिकाची मदत करणार आहे." भावाच्या आयुष्यावर 'आरती'ची कथा 'आरती - द अननोन लव्ह स्टोरी' हा चित्रपट सारिका मेने यांचा भाऊ सनी पवारच्या आयुष्यावर आधारित आहे. 2006 मध्ये एका अपघातात सनीची गर्लफ्रेण्ड आरती मकवाना गंभीर जखमी झाली. ती कोमात गेली. तिला मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2010 मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच चार वर्ष सनीने तिची संपूर्ण काळजी घेतली. गर्लफ्रेण्डप्रती सनीची समर्पणाची बातमी झाली होती. 'ऑक्टोबर'च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दरम्यान, सारिका मेनेने ऑक्टोबरच्या निर्मात्यांविरोधात विले पार्ले पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच मराठी फिल्ममेकर्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनकडेही याची तक्रार केली आहे. निर्मात्यांनी आरोप फेटाळले परंतु 'ऑक्टोबर'च्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. "ऑक्टोबरवर झालेले कॉपीराईटचे आरोप आम्ही समजू शकतो. पण आम्ही क्रिएटिव्ह लोक आहोत. कामावर आणि आमच्या टीमवर आम्हाला विश्वास आहे. या टीमने पिकू, पिंक यांसारखे दमदार चित्रपट केले आहेत. आम्ही आरती सिनेमाबद्दल फारसं ऐकलेलं नाही आणि संपूर्ण प्रकरण काय आहे, हेदेखील माहित नाही. संबंधित चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्ही ह्या प्रकरणात लक्ष घालू," असं परिपत्रक ऑक्टोबरचे सहनिर्माती कंपनी रायझिंग सन पिक्चर्सने जारी केलं आहे. 'आरती - द अननोन लव्ह स्टोरी' सिनेमाचा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget